TRENDING:

Vastu Tips: शूज-चप्पल खरेदीसाठी हा दिवस टाळावा, 90% लोक करतात चूक, त्यासोबत घरी आणतात दारिद्र्य

Last Updated:
Vastu Tips For Shoes: दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी वास्तुशास्त्रात नियम आहेत. या नियमांच्या विरोधात जाणं एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणू शकतं. आपलं नशीब आणि दुर्दैव काही गोष्टींच्या खरेदीशी देखील संबंधित आहे. शूज किंवा चप्पल खरेदी करणं त्यापैकी एक मानलं जातं. वास्तुशास्त्रात अशा काही दिवसांचा उल्लेख आहे ज्यादिवशी शूज किंवा चप्पल खरेदी करून घरी आणणे अशुभ मानले जाते. ज्योतिषी डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून जाणून घेऊया, कोणत्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करू नयेत.
advertisement
1/5
शूज-चप्पल खरेदीसाठी हा दिवस टाळा, 90% लोक करतात चूक, सोबत घरी आणतात दारिद्र्य
कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करू नये: सर्वसाधारणपणे कोणताही व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार शूज-चप्पल खरेदी करतो, त्यासाठी दिवस किंवा शुभ मुहूर्त पाहिला जात नाही. परंतु, वास्तुशास्त्रानुसार अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी करणे टाळावे. या दिवशी खरेदी केलेल्या शूज-चप्पलमुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
2/5
या दिवशी शूज आणि चप्पल का खरेदी करू नयेत : ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा संबंध पायाशी मानला जातो, त्यामुळे शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करू नये, असे सांगितले जाते. शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी केल्याने व्यक्तीवर शनिदोष येतो. यामुळे शनिदेवाची व्रकदृष्टी पडल्यानं घरात दुःख आणि गरिबी येते, असे मानले जाते. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
3/5
नवीन शूज आणि चप्पल कोणत्या दिवशी खरेदी कराव्यात: नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्यासाठी आणि परिधान करण्यासाठी योग्य दिवसाबद्दल देखील वास्तुशास्त्र सांगते. शुक्रवारी नवीन शूज आणि चप्पल खरेदी करणे आणि ठेवलेले नवीन शूज आणि चप्पल शुक्रवारीच घालणे चांगले आहे. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
4/5
फाटलेल्या शूज-चप्पल कोणत्या दिवशी फेकून द्याव्यात : जुने किंवा न वापरात नसलेले जोडे-चप्पल फेकून देण्याचा उल्लेख वास्तुशास्त्रात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जुने शूज आणि चप्पल शनिवारी कोणत्याही शनि मंदिराबाहेर ठेवाव्यात. या उपायाने मनुष्य शनीच्या वक्र दृष्टीपासून वाचतो. (इमेज-कॅनव्हा)
advertisement
5/5
येथे शूज आणि चप्पल ठेवू नका : वास्तुशास्त्रानुसार चुकूनही तुम्ही ज्या पलंगावर झोपत आहात त्याखाली शूज आणि चप्पल ठेवू नयेत. असे केल्याने पलंगावर झोपलेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. (इमेज-कॅनव्हा)(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Tips: शूज-चप्पल खरेदीसाठी हा दिवस टाळावा, 90% लोक करतात चूक, त्यासोबत घरी आणतात दारिद्र्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल