Akash deep : लहानपणी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं, आकाश दीपने दिली 'गुड न्यूज', पाहा Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Akash deep Buys new Car : अशातच आता आकाश दीपच्या घरी नवी कोरी चारचाकी आली आहे. लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची गुड न्यूज आकाश दीपने सोशल मीडियावर दिली.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार बॉलर आकाश दीप याने इंग्लंड दौऱ्यात अफलातून कामगिरी केली आणि टीम इंडियाला दोन महत्त्वाचे विजय मिळवून दिले. अशातच आकाशची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाले आहेत.
advertisement
2/7
आकाश दीप आपल्या संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळतो. तसेच बहि‍णींची जबाबदारी देखील त्याच्यावरच आहे. तसेच बहिणीच्या कॅन्सरसाठी देखील आकाश झगडताना दिसतोय.
advertisement
3/7
अशातच आता आकाश दीपच्या घरी नवी कोरी चारचाकी आली आहे. लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची गुड न्यूज आकाश दीपने सोशल मीडियावर दिली.
advertisement
4/7
आकाशचा जन्म बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते आणि त्यांची कमाई कुटुंबासाठी जेमतेम पुरेशी होती.
advertisement
5/7
आकाशने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला असतानाच, त्याने अवघ्या काही महिन्यांत आपले वडील आणि काका यांना गमावले. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.
advertisement
6/7
बिहारमधील स्थानिक लीगमध्ये त्याने आपल्या बॉलिंगने सर्वांना प्रभावित केले. त्याच्यातील टॅलेंट ओळखून त्याला बंगालमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तिथेही त्याने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली.
advertisement
7/7
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) कडून खेळण्याची त्याला संधी मिळाली आणि तिथेही त्याने आपली क्षमता सिद्ध केली. अखेर, त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आणि त्याने भारतीय टीममध्ये पदार्पण केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Akash deep : लहानपणी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं, आकाश दीपने दिली 'गुड न्यूज', पाहा Photos