Karishma Kapoor Property : आता मागतेय मृत नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा, डिवोर्सनंतर संजय कपूरने करिश्माला पोटगी म्हणून काय काय दिलेलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Karishma Kapoor Property: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर नेहमी तिच्या चित्रपटांसाठी चर्चेत राहिली. पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र गोड- कडू अनुभवांनी भरलेलं आहे. सध्या ती EX पती संजय कपूरच्या प्रॉपर्टी वादामुळे चर्चेत आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर नेहमी तिच्या चित्रपटांसाठी चर्चेत राहिली. पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र गोड- कडू अनुभवांनी भरलेलं आहे. सध्या ती EX पती संजय कपूरच्या प्रॉपर्टी वादामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/7
करिश्माने 2006 मध्ये दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं होतं. पारंपरिक शीख पद्धतीने झालेले हे लग्न भव्य सोहळा ठरला होता. काही वर्षांतच दोन मुलं समायरा आणि कियान झाल. पण वैवाहिक जीवन फार काळ सुखी राहिलं नाही.
advertisement
3/7
करिश्माने संजय कपूरवर घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळाचे गंभीर आरोप केले. अखेर 2014 मध्ये दोघे वेगळे झाले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
4/7
घटस्फोटानंतर करिश्माला मोठी सेटलमेंट मिळाली. सुमारे 70 कोटी रुपये, मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड आणि त्यावर 10 लाखांचे वार्षिक व्याज, तसेच लग्नात दिलेले दागिने आणि मुंबईतील आलिशान बंगला परत मिळाला.
advertisement
5/7
आज करिश्मा कपूरची एकूण संपत्ती अंदाजे, सुमारे 120 कोटी रुपये आहे. संजय कपूरशी घटस्फोटानंतर करिश्माने स्वतःला सावरलं. ब्रँड एंडोर्समेंट्स, जाहिराती आणि अधूनमधून चित्रपटांमधून ती पुन्हा लोकांसमोर आली. दुसरीकडे, संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केलं.
advertisement
6/7
12 जून 2024 रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना संजय कपूर यांचे अचानक निधन झाले आणि कपूर कुटुंबात संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला. तब्बल 30 हजार कोटींची संपत्ती मागे ठेवून गेलेल्या संजय कपूरच्या मृत्युपत्राबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
advertisement
7/7
करिश्मा कपूरची दोन्ही मुलं समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की सावत्र आई प्रिया सचदेव यांनी वडिलांच्या मृत्युपत्रात छेडछाड केली आहे आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. मुलांची मागणी आहे की त्यांना वडिलांच्या संपत्तीत पाचवा हिस्सा मिळावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Karishma Kapoor Property : आता मागतेय मृत नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा, डिवोर्सनंतर संजय कपूरने करिश्माला पोटगी म्हणून काय काय दिलेलं?