Hruta Durgule: आठवीतलं प्रेम, 3 महिन्यातच संपलं, आईच्याच फोनने केला गेम; हृता दुर्गुळेची ब्रेकअप स्टोरी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Hruta Durgule: मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीवर आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. तिचा मोठा चाहतावर्ग असून नेहमीच चर्चेत असते. नुकतंच हृताने तिच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगितलं.
advertisement
1/7

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृता आणि ललित प्रभाकर यांचा आरपार हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
advertisement
2/7
प्रमोशनदरम्यान हृताने केलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित खुलासा केला. ज्यामध्ये तिने तिच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगितलं. जे सध्या सर्वांच्या भुवया उंचावत आहे.
advertisement
3/7
हृता आणि ललितने 'आरपार' या सिनेमाच्या निमित्ताने 'जस्ट नील थिंग्स' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या "पहिल्या प्रेमाबद्दल" विचारण्यात आले. यावर हृताने हसतच पण स्पष्टपणे उत्तर दिलं.
advertisement
4/7
हृता म्हणाली, "मी आठवीत होते, तेव्हा एका मित्राने मला प्रपोज केलं होतं. ते खरं तर फोनवरचं नातं होतं. मी आईच्या फोनवरून त्याच्याशी बोलायचे आणि अखेर आईने मला रंगेहात पकडलं. तेव्हा आम्हाला प्रेमाचं खरं स्वरूप कळत नव्हतं, फक्त एक छोटं आकर्षण होतं."
advertisement
5/7
हृता पुढे म्हणाली की, हे नातं फार काळ टिकले नाही. दोन-तीन महिन्यांनंतरच ते संपलं. "तो मुलगा माझ्या शाळेतला नव्हता, आम्ही एका म्युच्युअल फ्रेंडमुळे भेटलो होतो," असंही तिने सांगितलं.
advertisement
6/7
दरम्यान, आरपारसोबतच दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा चित्रपटही त्याच दिवशी रिलीज होत आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धा होणार आहे.
advertisement
7/7
हृता आणि ललितच्या या सिनेमाला प्रेक्षक कितपत साथ देतात, हे पाहणं आता मनोरंजक ठरणार आहे. दोघांची केमेस्ट्री ट्रेलरमध्ये तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतेय मात्र पडद्यावरही प्रेक्षकांचं मन जिंकणार का? हे पाहणं अधिक उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hruta Durgule: आठवीतलं प्रेम, 3 महिन्यातच संपलं, आईच्याच फोनने केला गेम; हृता दुर्गुळेची ब्रेकअप स्टोरी