दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तानी क्रिकेटरच्या घरावर फायरिंग, पाच तरुणांचा बेछूट गोळीबार, काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Naseem Shah house firing : गोळीबाराच्या घटनेनंतर नसीम श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तसेच झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या T20 तिरंगी मालिकेत पाकिस्तानकडून खेळण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध असेल.
advertisement
1/7

एकीकडे दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील चौकात मोठा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता स्टार क्रिकेटरच्या घरावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
2/7
ही घटना सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लोअर दिर भागात घडली. या घटनेत क्रिकेटरच्या घरी अंदाधुंद गोळीबार झाला.
advertisement
3/7
हल्ला झाला तेव्हा क्रिकेटरचे कुटुंब घरी होते असं अहवालात म्हटलं आहे. हल्ल्यात खिडक्या, पार्किंग क्षेत्र आणि मुख्य गेटचे नुकसान झालं आहे.
advertisement
4/7
मात्र, क्रिकेटरचा धाकटे भाऊ, हुनैन शाह आणि उबैद शाह हे त्यावेळी घरी होते की नाही हे स्पष्ट नाही. गोळीबार करणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
5/7
अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे आणि प्रकरणाचा तपास केला जात आहे. या हल्ल्यात कुटुंबातील कोणताही सदस्य जखमी झाला नसल्याचे वृत्त आहे.
advertisement
6/7
हा स्टार खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा फास्ट बॉलर नसीम शाह आहे. नसीम शाहच्या कुटूंबियांना या घटनेनंतर धक्काच बसलाय.
advertisement
7/7
दरम्यान, नसीम श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तसेच झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या T20 तिरंगी मालिकेत पाकिस्तानकडून खेळण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तानी क्रिकेटरच्या घरावर फायरिंग, पाच तरुणांचा बेछूट गोळीबार, काय घडलं?