CSK चे 40 लाख पाण्यात! धोनीने त्याला विश्वासाने घेतलं, पण 10 ओव्हरमध्ये रचला 'नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Aman Khan Worst World Record : सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या पोरानं अशी कामगिरी केलीये की, धोनीला देखील मान खाली घालावी लागली. अमन खान याने 10 ओव्हरमध्ये 123 धावा दिल्या आहेत.
advertisement
1/7

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठमोठे रेकॉर्ड मोडले जात असल्याचं पहायला मिळतंय. तसेच सध्या अनेक खेळाडूंच्या खेळाची चर्चा होत आहे. अहमदाबाद येथे झालेल्या एका मॅचमध्ये झारखंडने पुडुचेरीविरुद्ध 368 रन्सचा डोंगर उभा केला.
advertisement
2/7
झारखंडच्या या मोठ्या धावसंख्येमध्ये कुमार कुशाग्रचे शतक आणि अनुकूल रॉयच्या नाबाद 98 रन्सचा मोठा वाटा होता. मात्र, या मॅचमध्ये एका खेळाडूने नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
advertisement
3/7
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) नुकत्याच झालेल्या IPL 2026 च्या लिलावात 40 लाख रुपयांना खरेदी केलेल्या अमन खानसाठी ही मॅच खूपच महागडी ठरली. पुडुचेरीचा कॅप्टन असलेल्या अमनने या मॅचमध्ये 10 ओव्हरमध्ये 123 रन्स मोजले.
advertisement
4/7
लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा स्पेल ठरला आहे. त्याने 1 विकेट घेतली खरी, पण त्याची इकॉनॉमी 12.30 ची राहिली. यापूर्वी हा खराब रेकॉर्ड अरुणाचल प्रदेशच्या मिबोम मोसूच्या नावावर होता
advertisement
5/7
मिबोम मोसूने बिहारविरुद्ध 116 रन्स दिले होते. अमन खानने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईतून केली होती, पण सध्या तो पुडुचेरीचे नेतृत्व करत आहे. या मॅचमध्ये पुडुचेरीचा संघ 235 रन्सवर बाद झाला आणि त्यांना 133 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला.
advertisement
6/7
अमनने बॅटिंग करताना 24 बॉलमध्ये 28 रन्स केले. चेन्नईने त्याला 40 लाख देऊन खरेदी केलं होतं. IPL च्या लिलावात चेन्नईने त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवला होता. अमन यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमचा हिस्सा राहिला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, आता आगामी हंगामात धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. पद्दूचेरीच्या कॅप्टनला चेन्नई आता संधी देणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
CSK चे 40 लाख पाण्यात! धोनीने त्याला विश्वासाने घेतलं, पण 10 ओव्हरमध्ये रचला 'नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड'