IPL 2026 : फक्त 5 टी20 सामने खेळला, तरी खेळाडुला बनवला कोच, धोनीच्या CSKचा धक्कादायक निर्णय
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना हा 30 मार्च 2026 रोजी राजस्थान रॉयल्स विरूद्ध असणार आहे.हा सामना गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
advertisement
1/8

आयपीएलच्या 19 व्या सीझनला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा डिफेंडीग चॅंम्पियन रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात असणार आहे.
advertisement
2/8
तर चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना हा 30 मार्च 2026 रोजी राजस्थान रॉयल्स विरूद्ध असणार आहे.हा सामना गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
advertisement
3/8
दरम्यान या हंगामाला सुरुवात व्हायला दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/8
चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या फिल्डींग कोचपदी इंग्लंडच्या जेम्स फोस्टरची नियुक्ती केली आहे.त्यामुळे आता जेम्स चेन्नईच्या खेळाडूंना कोचिंग करताना दिसणार आहे.
advertisement
5/8
दरम्यान हे 45 वर्षीय जेम्स फोस्टर नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. जेम्स फोस्टर यांचा कोचिंग अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी दुबईच्या टी20 लिग आयएलटी 20 मध्ये डेजर्ट वाइपर्सला चॅम्पियन बनवलं आहे.
advertisement
6/8
तसेच द हंड्रेड लीगमध्ये जेम्स बर्मिघम फिनिक्सचेही असिस्टंट कोचच आहे. याआधी ते आयपीएलमध्ये देखील कोचिंग स्टाफचा हिस्सा होते. 2020 ते 2023 पर्यंत ते कोलकत्ताच्या कोचिंग स्टाफमध्ये होते.
advertisement
7/8
दरम्यान जेम्स फोस्टर इंग्लंडचे विकेटकिपर आणि बॅटर होते. त्यांनी 7 टेस्ट, 11 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले आहेत. 2001 आणि 2009 पर्यंत ते खेळाडू म्हणून मैदानात अॅक्टीव्ह होते.
advertisement
8/8
चेन्नई सुपर किंग्जने एक अनुभवी कोचिंग स्टाफ आणि उत्कृष्ट खेळाडूंच्या ग्रुपमध्ये फोस्टरला संघात घेतलं आहे. या टीमचे दिग्गज स्टिफन फ्लेमिंग आधीच संघाचे हेड कोच आहेत. तर फलंदाजी प्रशिक्षक माइकल हसी आणि गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स आहे. या सगळ्यांसोबत आता फोस्टर जोडले जाणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : फक्त 5 टी20 सामने खेळला, तरी खेळाडुला बनवला कोच, धोनीच्या CSKचा धक्कादायक निर्णय