Prajakta Mali : फोन नाही, बाहेरचं जेवण नाही! 15 दिवस कुठे होती प्राजक्ता माळी? अभिनेत्रीनं सगळं सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी गेली पंधरा दिवस ज्या ठिकाणी होती तिथे तिला फोन वापरण्यास परवानगी नव्हती. तसंच बाहेरचं जेवण खाण्यासही परवानगी नव्हती. अभिनेत्रीनं चाहत्यांना सगळं सांगितलं.
advertisement
1/8

मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता अचानक सोशल मीडियावरून गायब झाली होती.
advertisement
2/8
गेल्या 15 दिवसांपासून प्राजक्ता माळी नॉट रिचेबल असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. ती नेमकी कुठे आहे? काय करत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता प्राजक्ता पुन्हा सोशल मीडियावर परतली असून तिने एक खास पोस्ट शेअर करत महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
3/8
प्राजक्ता 15 दिवस ज्या ठिकाणी होती तिथे तिला फोन वापरण्याची परवानगी नव्हती. तिला बाहेरचं अन्नही खाता येत नव्हतं. प्राजक्ता अशा कोणत्या ठिकाणी गेली होती?
advertisement
4/8
प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळुरूमधील आश्रमात गेली होती. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "गुरूंच्या कृपेने… मी Art of Living च्या Happiness Programme ची शिक्षिका झाले आहे."
advertisement
5/8
या प्रशिक्षणाबाबत सांगताना तिने लिहिलं की, "15 दिवसांचं तीव्र शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षण तिने पूर्ण केलं. या काळात तिला फोन वापरण्याची परवानगी नव्हती आणि बाहेरचं अन्नही खाता येत नव्हतं. दररोज पद्मसाधना केली (ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे.) आणि अजून बरंच काही अनुभवलं, जे शब्दांत सांगणं कठीण आहे."
advertisement
6/8
तिने पुढे लिहिलंय, "हो, मी लवकरच शिकवायला सुरुवात करणार आहे. Stay tuned." प्राजक्ताच्या या पोस्टनंतर काही चाहत्यांना असा प्रश्न पडला की, ती आता अभिनय क्षेत्र सोडणार का? मात्र यावरही अभिनेत्रीने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
advertisement
7/8
पोस्टच्या शेवटी तिने लिहिलंय, "मी अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जाणार नाही. गेल्या 8 वर्षांप्रमाणेच या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणार आहे."
advertisement
8/8
प्राजक्ताच्या या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिला शुभेच्छा देत तिच्या या नव्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. प्राजक्ता आता पुढे काय नवीन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : फोन नाही, बाहेरचं जेवण नाही! 15 दिवस कुठे होती प्राजक्ता माळी? अभिनेत्रीनं सगळं सांगितलं