TRENDING:

Rohit Sharma : 3 महिने, आठवड्याचे 6 दिवस, रोज 3 तास...रोहितने कसं घटवलं 11 किलो वजन? नायरने सांगितलं सीक्रेट

Last Updated:
रोहितने वजन तर घटवलं पण त्याची चांगली चालली नाही. रोहितने तब्बल 11 किलो वजन घटवलं.पण हे वजन त्याने कसं घटवलं?याची आता माहिती समोर आली आहे.
advertisement
1/7
3 महिने, आठवड्याचे 6 दिवस, रोज 3 तास...रोहितने कसं घटवलं 11 किलो वजन? नायरने सां
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आज मोठ्या ब्रेकनंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध मैदानात उतरला होता. मात्र तो अवघ्या 8 धावा करून बाद झाला.
advertisement
2/7
रोहितने वजन तर घटवलं पण त्याची चांगली चालली नाही. रोहितने तब्बल 11 किलो वजन घटवलं.पण हे वजन त्याने कसं घटवलं?याची आता माहिती समोर आली आहे.
advertisement
3/7
रोहित शर्माच्या वेट लॉस जर्नीवर अभिषेक नायरने भाष्य केलं आहे.यावेळी तो म्हणाला, "मलाही वाटलं नव्हतं की त्याचं (रोहित शर्मा) वजन इतकं कमी होईल.आम्ही हे आधी करून पाहिलं होतं पण वेळेअभावी किंवा काही मालिकांमुळे ते सातत्य रहायचं नाही.
advertisement
4/7
रोहित शर्माने तीन महिन्यात वजन कमी केलं आहे. पहिले पाच आठवडे आम्ही बॉडी बिल्डरच्या माईंड सेटने वर्कआऊट केले. ज्यामध्ये त्याने प्रत्येक व्यायामाची रेपिटेशन वाढवली. प्रत्येक व्यायामात त्याने 700 ते 800 रेपिटेशन्स मारले.
advertisement
5/7
पुढे नंतर प्रत्येक सत्र 15-20 मिनिटे क्रॉस फिटने पूर्ण करत होता जो अधिक कार्डिओ-आधारित आणि हालचालींवर आधारित होता.अशाप्रकारे 3 महिन्यात प्रत्येक आठवड्याचे 6 दिवस आणि प्रत्येक दिवसाचे तीन तास देऊन त्याने वजन घटवलं असे अभिषेक नायर म्हणाला.
advertisement
6/7
पण इतक्यावर सर्व चालणार नव्हतं. कारण तोंडावर ताबाही गरजेचा होता.त्यामुळे आम्हाला त्याच्या खाण्याच्या सवयीत बदल आणायचा होता. त्यामुळे त्याने घरी जाऊन प्रसिद्ध वडापाव खाणार नाही अशी त्याची वचनबद्धता होती.खेळाप्रती त्याची वचनबद्धता होती.
advertisement
7/7
जेव्हा तुमचे शरीर वजन कमी करते तेव्हा एक..."तुमच्या हालचालींमध्ये, तुम्हाला कसे वाटते यात खूप बदल झाले आहेत, म्हणून ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, ते खूप कठीण काम होते. बॉडी बिल्डर बनण्यासाठी ते दुबळे आणि अ‍ॅथलेटिक असणे,असे अभिषेक नायर म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 3 महिने, आठवड्याचे 6 दिवस, रोज 3 तास...रोहितने कसं घटवलं 11 किलो वजन? नायरने सांगितलं सीक्रेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल