IND vs SA : बुमराहने रेकॉर्ड केला, पण चर्चा अर्शदिपचीच, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कटकच्या बाराबती स्टेडिअमवर रंगलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह आता भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
1/7

कटकच्या बाराबती स्टेडिअमवर रंगलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह आता भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
2/7
या सामन्यात जसप्रीत बुमराहने टी20 क्रिकेटमध्ये आज 100 विकेटचा रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे बुमराहने हा रेकॉर्ड करून देखील अर्शदिपचीच चर्चा रंगली आहे.
advertisement
3/7
जसप्रीत बुमराहने 81 मॅचेसमध्ये 100 विकेटचा पल्ला गाठला आहे. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 6.28 होता.
advertisement
4/7
तर अर्शदिपने बुमराहच्या आधीच हा पल्ला गाठला आहे. अर्शदिपने 68 मॅचमध्ये 107 विकेटस घेतल्या आहेत. त्याच्या इकॉनॉमी रेट 7.45 आहे.
advertisement
5/7
विशेष म्हणजे भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये 100 हून अधिक विकेट घेणारा अर्शदिप पहिला बॉलर ठरला आहे. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहचा नंबर लागतो. त्यामुळे अर्शदिपची सिंहची चर्चा रंगली आहे.
advertisement
6/7
बुमराहच स्वागत आहे. मी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला म्हटले, "क्लबमध्ये आपले स्वागत आहे",असे अर्शदिप सिंह मॅचनंतर म्हणाला.
advertisement
7/7
दरम्यान अर्शदिप फक्त 26 वयाचा आहे आणि बुमराह 32 वयाचा आहे. बुमराहला तो ज्यूनिअर असून देखील अर्शदिपने सर्वात आधी 100 विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे त्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : बुमराहने रेकॉर्ड केला, पण चर्चा अर्शदिपचीच, नेमकं काय घडलं?