IPL 2025 Points table : मुंबई इंडियन्सला हरवताच गुजरात टायटन्सला लॉटरी, पाईंट्स टेबलमध्ये मोठी झेप, पाहा पलटण कुठे?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2025 Points table Update : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. नेमकं कोण कुठल्या स्थानी जाणून घ्या.
advertisement
1/7

आयपीएलच्या 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पहावं लागलं. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्स नवव्या स्थानावर होती. त्यावेळी शून्य गुणासह गुजरातचा नेट रनरेट -0.55 होता. आता गुजरातने मोठी झेप घेतली आहे.
advertisement
3/7
गुजरात टायटन्स आता नवव्या स्थानावरून आता थेट तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. मुंबईचा पराभव केल्यानंतर नेट रनरेट देखील सुधारला असून +0.625 वर पोहोचली आहे.
advertisement
4/7
तर मुंबई इंडियन्स मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स -0.49 नेट रनरेटसह आठव्या स्थानी होती. आता मुंबई नवव्या स्थानी पोहोचली आहे.
advertisement
5/7
मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट खराब झाला असून -1.163 आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला आगामी सामन्यात मोठे विजय मिळवावे लागतील.
advertisement
6/7
आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये RCB चा संघ अजूनही टॉपवर आहे. आरसीबीने दोन्ही सामन्यात विजय मिळवल्याने बंगळुरूचा नेट रनरेट देखील मजबूत झालाय.
advertisement
7/7
दरम्यान, पाईंट्स टेबलच्या तळाशी राजस्थान रॉयल्सचा संघ असून त्यांनी दोन्ही सामने गमावले आहेत. आता चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची तयारी आरआरची असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2025 Points table : मुंबई इंडियन्सला हरवताच गुजरात टायटन्सला लॉटरी, पाईंट्स टेबलमध्ये मोठी झेप, पाहा पलटण कुठे?