TRENDING:

IPL 2026 : रोहित शर्माला मोठी जबाबदारी... 12 दिवस आधी मुंबई इंडियन्सने गेम फिरवला!

Last Updated:
आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधीच मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आहे. मुंबईने रोहित शर्मावर मोठी जबाबदारी दिली आहे.
advertisement
1/7
रोहित शर्माला मोठी जबाबदारी... IPL च्या 12 दिवस आधी मुंबई इंडियन्सने गेम फिरवला!
आयपीएल 2026 मध्ये पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि एसआरएच यांच्यात होणार आहे. तर दुसरी मॅच 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होईल.
advertisement
2/7
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन सगळ्यात यशस्वी टीम आहेत. मुंबई आणि सीएसकेने आतापर्यंत 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
advertisement
3/7
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सर्व 5 ट्रॉफी या रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकल्या, पण 2024 साली मुंबईने रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढून टाकलं आणि हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, यावरून मोठा वाद निर्माण झाला. रोहितला कॅप्टन्सीवरून हटवल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर हार्दिकला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं.
advertisement
4/7
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने बऱ्याच सामन्यांमध्ये रोहित शर्माचा इम्पॅक्ट सब म्हणून वापर केला, यावरूनही टीका झाली. रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूची कर्णधाराला मैदानात जास्त गरज असते, पण तरीही रोहितला डगआऊटमध्ये ठेवल्यामुळे वाद झाला होता.
advertisement
5/7
आयपीएल 2026 मध्ये मात्र रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्माबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
advertisement
6/7
आयपीएल 2026 मध्ये रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही, तर यंदा रोहित मैदानात फिल्डिंग करताना दिसेल. आयपीएलच्या मागच्या मोसमात रोहितला फिटनेसची समस्या होती, तसंच आम्हाला त्याचा वर्क लोड मॅनेज करायचा होता, असं जयवर्धने म्हणाला.
advertisement
7/7
आयपीएल 2026 मध्ये रोहित शर्मा जास्त वेळ फिल्डिंगसाठी मैदानात थांबला तर याचा फायदा कर्णधार हार्दिक पांड्या आणि टीमला होऊ शकतो, कारण रोहित मैदानात त्याचा अनुभव आणि सल्ला खेळाडूंसोबत शेअर करू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : रोहित शर्माला मोठी जबाबदारी... 12 दिवस आधी मुंबई इंडियन्सने गेम फिरवला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल