TRENDING:

Mohammed Siraj ठरला टीम इंडियाचा सर्वात 'भरोश्याचा खेळाडू', 34 वर्षानंतर कपिल देव यांची बरोबरी!

Last Updated:
Mohammed Siraj New Record : तर मोहम्मद सिराजने एक खास रेकॉर्ड देखील नावावर केला. मोहम्मद सिराजने ते काम करून दाखवले आहे, जे भारतीय क्रिकेटमध्ये 34 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी केलं होतं.
advertisement
1/7
Mohammed Siraj ठरला टीम इंडियाचा सर्वात 'भरोश्याचा खेळाडू', 34 वर्षानंतर...
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान बॉलर मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी सीरिजमधील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने अनेक विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
2/7
तर मोहम्मद सिराजने एक खास रेकॉर्ड देखील नावावर केला. मोहम्मद सिराजने ते काम करून दाखवले आहे, जे भारतीय क्रिकेटमध्ये 34 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी केलं होतं.
advertisement
3/7
1991-92 मध्ये महान ऑलराऊंडर कपिल देव यांनी भारतासाठी एकाच कॅलेंडर ईयरमध्ये दोन वेगवेगळ्या कसोटी सीरिजमध्ये 150 पेक्षा जास्त ओव्हर टाकले होते. आता इतक्या वर्षांनी मोहम्मद सिराजनेही तीच कामगिरी पुन्हा केली आहे.
advertisement
4/7
2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सिराजने 157.1 ओव्हर टाकले होते. तर, 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत 155.2 ओव्हर बॉलिंग केली आहे.
advertisement
5/7
इंग्लंडविरुद्ध सिराजने आतापर्यंत दमदार बॉलिंग केली आहे. त्याने एकूण 18 विकेट्स घेतले आहेत. एकदा त्याने 5 विकेट्स आणि एकदा 4 विकेट्सही घेतले आहेत.
advertisement
6/7
सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या शर्यतीत सिराज सर्वात पुढे आहे. ते ही कोणत्याही दुखापतीशिवाय तो सातत्याने खेळतोय. तसेच तो लांब लांब स्पेल देखील टाकू शकतो.
advertisement
7/7
दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या खात्यात 14 विकेट्स आहेत, तर आकाशदीपने आतापर्यंत 12 विकेट्स घेतले आहेत. पण सिराजने या दोघांपेक्षा जास्त ओव्हर टाकले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mohammed Siraj ठरला टीम इंडियाचा सर्वात 'भरोश्याचा खेळाडू', 34 वर्षानंतर कपिल देव यांची बरोबरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल