हरमनप्रीतला काढा, स्मृती नाही तर 'या' खेळाडूला कॅप्टन करा, मिताली राज स्पष्टच बोलली!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mithali Raj On Harmanpreet Kaur : आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2024 मधील संघाच्या निराशाजनक पराभवानंतर भारताची माजी कर्णधार मिताली राजने नेतृत्व बदलाचं आवाहन केलं आहे.
advertisement
1/7

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर आता टीम इंडिया वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीतची एकाकी झुंज अपयशी ठरली.
advertisement
2/7
टीम इंडियाच्या संपूर्ण संघाची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी कॅप्टन हरमनप्रीत कौरवर पराभवाचं खापर फोडलं जातंय. अशातच आता टीम इंडियाची माजी कॅप्टन मिताली राजने मोठं वक्तव्य केलंय.
advertisement
3/7
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे टीम इंडियाला नवा कॅप्टन मिळावा, असं मिताली राजने म्हटलं आहे.
advertisement
4/7
जर सिलेक्टर्स टीम इंडियाच्या बदलाकडे पाहत असतील तर मी टीमसाठी नवा युवा कॅप्टन असावा, असं म्हणेल. हीच योग्य वेळ आहे, असंही मिताली म्हणाली.
advertisement
5/7
आता जर कॅप्टन बदलला नाही तर आगामी वर्ल्ड कप आपल्यासमोर आहे. जर आता कॅप्टन बदलण्याचा निर्णय घ्यायचा नसेल तर वर्ल्ड कपनंतर कॅप्टन बदलावा, असंही मिताली राज म्हणाली.
advertisement
6/7
स्मृती मानधना सारखी प्लेयर टीम इंडियासाठी उपकर्णधार राहिली आहे. पण मला वाटतं की जेमिमा कॅप्टन म्हणून योग्य राहिल, असं मत मितालीने बेधकपणे मांडलं आहे.
advertisement
7/7
जेमिमा आता फक्त 24 वर्षांची आहे. ती जास्त वेळासाठी कॅप्टन्सी करू शकते. ती मैदानात सकारात्मक उर्जासह उतरेली असते. अनेक सामन्यात तिने प्रभावित देखील केलंय, असं म्हणत मितालीने जेमिमाचं कौतूक देखील केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
हरमनप्रीतला काढा, स्मृती नाही तर 'या' खेळाडूला कॅप्टन करा, मिताली राज स्पष्टच बोलली!