IND vs NZ : ऋषभ पंतची सुट्टी पक्की, ईशान किशनचं 'या' दोघांचं होणार कमबॅक; ODI सिरीजसाठी कधी होणार घोषणा?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team India Squad for New Zealand ODI series : आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजसाठी बीसीसीआय लवकरच अधिकृत घोषणा करणार असून, त्यामध्ये काही मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचची वनडे मालिका 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखालील संघ कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
2/7
'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला या वनडे मालिकेतून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघात असूनही त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नव्हती, त्यामुळे आता त्याला थेट बाहेर बसवले जाऊ शकते.
advertisement
3/7
ऋषभ पंतच्या जागी विस्फोटक फलंदाज ईशान किशन याला संघात स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत. किशनने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टी20 वर्ल्ड कप संघात आपली जागा निश्चित केली आहे.
advertisement
4/7
आता वनडे फॉरमॅटमध्येही ईशानचं पुनरागमन जवळपास निश्चित मानलं जात आहे. किशनच्या समावेशामुळे टीम इंडियाला केएल राहुलसाठी बॅकअप विकेटकीपर तर मिळेलच, शिवाय तो बॅकअप ओपनर म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
advertisement
5/7
पंतने आपला शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. दुसरीकडे, ईशान किशनने आपला शेवटचा वनडे सामना 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता.
advertisement
6/7
आता तब्बल दोन वर्षांनंतर त्याचे या फॉरमॅटमध्ये पुनरागमन होत आहे. निवड समिती या आठवड्याच्या शेवटी अधिकृत टीमची घोषणा करू शकते, ज्यामध्ये अनेक युवा चेहऱ्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
7/7
दरम्यान, ईशान किशनसह दोन स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं कमबॅक देखील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पहायला मिळू शकतं. दोन्ही खेळाडू सध्या डोमेस्टिक क्रिकेट खेळतायेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : ऋषभ पंतची सुट्टी पक्की, ईशान किशनचं 'या' दोघांचं होणार कमबॅक; ODI सिरीजसाठी कधी होणार घोषणा?