TRENDING:

रोहित शर्मा-हरमनप्रीतचा पद्म पुरस्काराने गौरव, वर्ल्ड कप विजेत्या दोन्ही कॅप्टन्सचा सन्मान!

Last Updated:
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
1/5
रोहित-हरमनप्रीतचा पद्म पुरस्काराने गौरव, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टन्सचा सन्मान!
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
advertisement
2/5
रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. पद्मश्री हा भारतामधला चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल रोहित आणि हरमनप्रीत यांचा गौरव होणार आहे.
advertisement
3/5
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला टीमने वनडे वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या कामगिरीबद्दल दोघांचाही सन्मान करण्यात आला आहे.
advertisement
4/5
भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर यावर्षी इंग्लंड दौऱ्याआधी रोहितने टेस्ट क्रिकेटला अलविदा केलं. तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितने वनडे टीमची कॅप्टन्सीही सोडली. रोहित आता फक्त भारताकडून वनडे क्रिकेट खेळत आहे.
advertisement
5/5
2027 साली होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी रोहित कठोर मेहनत घेत आहे. आता मिळालेला पद्मश्री पुरस्कार रोहितला आणखी कठोर मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रोहित शर्मा-हरमनप्रीतचा पद्म पुरस्काराने गौरव, वर्ल्ड कप विजेत्या दोन्ही कॅप्टन्सचा सन्मान!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल