SA vs IND : 'चेत्ता, तू ओपनिंग करणार...', सूर्याने दिलेला शब्द पाळला अन् Sanju Samson ने इतिहास रचला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanju Samson Statement On Suryakumar : टीम इंडियाने सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनच्या शतकीय खेळीच्या जोरावर धमाकेदार कामगिरी केली अन् पहिल्या कसोटी सामन्यात यजमान साऊथ अफ्रिका संघाचा पराभव केला. या सामन्यात संजूची खेळी गेमचेंजर ठरली. अशातच संजूने कॅप्टन सूर्याचं कौतूक केलंय.
advertisement
1/6

संजू सॅमसन याने विरुद्ध शतक ठोकून इतिहास रचला. टी-ट्वेंटीमध्ये बॅक टू बॅक शतक ठोकणारा संजू पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अशातच शतकानंतर संजूने मोठं वक्तव्य केलं अन् सूर्यकुमार यादवचे आभार मानले.
advertisement
2/6
मी दुलीप ट्रॉफी खेळ होतो. तेव्हा सूर्या देखील दुसऱ्या टीमकडून खेळत होता. त्यावेळी एका सामन्यावेळी सूर्या मला म्हणाला चेत्ता, तू तयारी कर.. आता तुला टीम इंडियासाठी पुढचे 7 मॅच ओपनिंग करायची आहे.
advertisement
3/6
सूर्याने दिलेला शब्द पाळला अन् मला सलामीला पाठवलं. काहीजरी झालं तरी मी तुला बॅक करणार, असं सूर्याने मला म्हटलं होतं, असं संजू सॅमसन ची आठवण काढत म्हणाला.
advertisement
4/6
सततच्या अपयशाच्या वेळी संवाद साधणं खूप महत्वाचं असतं, खेळाडू त्याच्या नकारात्मक काळात हरवू शकतो. श्रीलंका मालिकेनंतर मला गौतम भाई आणि सूर्या यांचे फोन आले, मला काय काम करायचं आहे ते सांगितलं, असा खुलासा देखील संजूने केला.
advertisement
5/6
फोनवर मला सूर्या म्हणाला, तुझा स्पिनविरुद्धचा गेम कठीण दिसत आहे, त्यामुळे केरळमध्ये स्पिनर्सला गोळा करा आणि खडबडीत विकेटवर सराव करा. मी त्याच्या सांगण्यानुसार गेम चेंज केला, असं संजूने म्हटलं.
advertisement
6/6
मला आठवतंय रवी शास्त्री माझ्याशी हैदराबादमध्ये बोलत होते. संजू तुला फक्त एका मोठ्या शतकाची गरज आहे. मी सांगतोय, तू बरा होशील, असं रवी शास्त्री म्हणाले होते. मला वाटतं की आम्ही आनंदी आहोत आणि मी प्रत्येकासाठी आनंदी आहे, असं ने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
SA vs IND : 'चेत्ता, तू ओपनिंग करणार...', सूर्याने दिलेला शब्द पाळला अन् Sanju Samson ने इतिहास रचला!