PAK vs USA: अमेरिकेला जिंकवण्यात किती 'भारतीय' खेळाडूंचा हात? सुपर ओव्हरमध्ये सुद्धा भारतीयाचीच कमाल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात गुरुवारी सामना पार पडला. या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला आहे. अमेरिकाने सुपर ओव्हरद्वारे या सामन्यात विजय मिळवला. अमेरिकेच्या वर्ल्ड कप टीममध्ये भारतात जन्मलेले काही खेळाडू आहेत ज्यांचा पाकिस्तान विरुद्धच्या विजयात मोठा सहभाग होता.
advertisement
1/5

अमेरिकेच्या वर्ल्ड कप टीम मध्ये 11 खेळाडूंपैकी 5 खेळाडू हे भारतीय आहेत. सध्या अमेरिकेच्या टीममध्ये खेळणारा मोनांक पटेल याचा जन्म भारताच्या गुजरात राज्यात झाला. त्याने अमेरिकेच्या टीमकडून खेळताना पाकिस्तानच्या टीम विरुद्ध अर्धशतक ठोकले ज्यात की चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. त्याने अंडर 16 आणि अंडर 18 मध्ये गुजरातच्या टीमचे प्रतिनिधित्व केले होते.
advertisement
2/5
अमेरिकेच्या टीममधील अजून एक खेळाडू म्हणजे हरमीत सिंह. हरमीत सिंहचा जन्म मुंबईत झाला होता. मात्र काही वर्षांनी तो अमेरिकेला शिफ्ट झाला. हरमीतने एका सामन्यात 4 ओव्हर बॉलिंग केली. मात्र त्याला एकही विकेट घेणे शक्य झाले नाही.
advertisement
3/5
अमेरिकेने पाकिस्तान विरुद्ध मिळवलेल्या विजयात सौरभ नेत्रवलकर याने महत्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. तेव्हा नेत्रवलकरने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करून पाकिस्तानच्या फलंदाजांना धावा बनवण्यापासून रोखलं. ज्यामुळे पाकिस्तानची टीम केवळ 13 धावा बनवू शकली आणि अमेरिकेचा विजय झाला.
advertisement
4/5
नितीश कुमार आणि जसदीप सिंह हे खेळाडू देखील भारतीय वंशाचे आहेत. नितीशने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 14 धावा केल्या तर जसदीपने 3 ओव्हर टाकून एक विकेट घेतली.
advertisement
5/5
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेची टीम : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उप-कर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर, शॅडली व्हॅन शाल्कविक , स्टीव्हन टेलर आणि शायन जहांगीर. राखीव खेळाडू : गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल आणि यासिर मोहम्मद.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs USA: अमेरिकेला जिंकवण्यात किती 'भारतीय' खेळाडूंचा हात? सुपर ओव्हरमध्ये सुद्धा भारतीयाचीच कमाल