TRENDING:

विराट मोठ्या मनाचा! बोल्ड काढणाऱ्या हिमांशू सांगवानला कोहलीने काय दिला सल्ला? ड्रेसिंग रुममधला व्हिडीओ व्हायरल

Last Updated:
Virat Kohli met Himanshu Sangwan : विराट कोहली 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला आला होता पण त्याला केवळ 6 धावा करता आल्या. त्याला वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने बाद केलं.
advertisement
1/7
विराट मोठ्या मनाचा! बोल्ड काढणाऱ्या हिमांशू सांगवानला कोहलीने काय दिला सल्ला?
रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघाने रेल्वे संघाचा पराभव केला आहे. दिल्लीने महत्त्वाच्या सामन्यात रेल्वे रणजी संघाचा एक डाव आणि 19 धावांनी पराभव केला. आयुष बदोनीच्या कॅप्टन्सीखाली दिल्लीने विजय मिळवलाय.
advertisement
2/7
दुसऱ्या डावात रेल्वेचे फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. शिवम शर्माने 33 डावात 5 विकेट्स काढल्या. त्यामुळे दिल्लीचा विजय आणखी सोपा झाला. तर आय़ुष बदोनीने देखील एक विकेट घेतली.
advertisement
3/7
विराट कोहलीला दुसरी इनिंग खेळला आली नाही. विराट केवळ एकच इनिंग खेळला. त्यात त्याने फक्त 6 धावा केल्या. हिमांशू सांगवानने विराट कोहली क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर आता हिमांशू सांगवानची चर्चा होऊ लागली आहे.
advertisement
4/7
सामना संपल्यानंतर विराट कोहलीने रेल्वेच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन हिमांशू सांगवानची भेट घेतली अन् त्याचं कौतूक केलं. ज्या बॉलने विकेट घेतली, त्या बॉलवर ऑटोग्राफ देखील केली.
advertisement
5/7
हा तोच चेंडू आहे का ज्याने तू मला बाद केलेस? असा सवाल विराटने विचारला. खुप चांगला बॉल होता, मला आवडलं, असं विराट म्हणाला. मी तुझ्याबद्दल ऐकले आहे. तू चांगला गोलंदाज आहेस, असं म्हणत विराटने त्याला शुभेच्छा देखील दिल्या.
advertisement
6/7
दिल्लीच्या नजफगडमध्ये हेमांशू सांगवानचा जन्म 2 डिसेंबर 1995 मध्ये झाला होता. त्याने दिल्लीच्या संघाकडून अंडर 19 संघात देखील सहभाग नोंदवला होता. मात्र, 2019 मध्ये त्याला रेल्वेकडून खेळण्याची संधी मिळाली.
advertisement
7/7
हेमांशूने संधी सोडली नाही अन् रेल्वेकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. युपीविरुद्ध त्याला डेब्यूची संधी मिळाली अन् त्याने 23 फर्स्ट क्लास सामन्यात 77 विकेट्स नावावर केल्या. आता त्याला विराट कोहलीसारख्या खेळाडूची विकेट देखील मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
विराट मोठ्या मनाचा! बोल्ड काढणाऱ्या हिमांशू सांगवानला कोहलीने काय दिला सल्ला? ड्रेसिंग रुममधला व्हिडीओ व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल