TRENDING:

Sarfaraz Khan : गंभीर अजूनही विसरला नाही ते प्रकरण... सरफराजच्या हकालपट्टीची Inside Story

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. गुवाहाटी टेस्टनंतर तर प्रेक्षकांनी गौतम गंभीरच्या विरोधात घोषणाबाजी केली.
advertisement
1/7
गंभीर अजूनही विसरला नाही ते प्रकरण... सरफराजच्या हकालपट्टीची Inside Story
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीमबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टेस्ट क्रिकेटसाठी स्पेशलिस्ट बॅटर आणि स्पेशलिस्ट बॉलर्सची गरज असतानाही ऑलराऊंडरची मोठ्या प्रमाणावर निवड केली गेली.
advertisement
2/7
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानची टीममध्ये निवड का होत नाही? यावरूनही निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीरला टार्गेट केलं जात आहे.
advertisement
3/7
सरफराज खानने 6 टेस्टमध्ये 37.10 च्या सरासरीने 371 रन केले आहेत, ज्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सरफराजने 150 रनची खेळी केली, पण या सीरिजनंतर सरफराजला संधी दिली गेली नाही.
advertisement
4/7
सरफराजने 60 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 63.15 च्या सरासरीने 4,863 रन केल्या आहेत, यात 16 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही सरफराजला अचानक टीमबाहेर करण्यात आलं.
advertisement
5/7
वर्षाच्या सुरूवातीला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी लिक झाल्या, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी लिक करण्यामागे सरफराज खान असल्याचा आरोप गौतम गंभीरने केल्याची वृत्त तेव्हा प्रसिद्ध झाली होती.
advertisement
6/7
ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर बीसीसीआयने गौतम गंभीरसोबत रिव्ह्यू मिटींग घेतली, या मीटिंगमध्ये ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी लिक झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला गेला, तेव्हा गंभीरने सरफराज खानचं नाव घेतल्याचं वृत्त न्यूज 24 ने दिलं होतं.
advertisement
7/7
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाही गंभीरला याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी गुप्त राहिल्या पाहिजेत, त्यामुळे टीममधला विश्वास वाढतो, असं गंभीर म्हणाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : गंभीर अजूनही विसरला नाही ते प्रकरण... सरफराजच्या हकालपट्टीची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल