TRENDING:

WTC Points Table : ॲशेस जिंकत ऑस्ट्रेलिया ठरली 'किंग', पण टीम इंडियाला फायदा की नुकसान? जाणून घ्या पाईंट्स टेबलचं समीकरण

Last Updated:
ICC World Test Championship 2025-2027 Points Table : इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली असून, या सायकलमधील त्यांचा दहा मॅचमधील हा सहावा पराभव आहे. 31.67 टक्के गुणांसह सध्या ते पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
advertisement
1/7
ॲशेस जिंकत ऑस्ट्रेलिया ठरली 'किंग', पण टीम इंडियाला फायदा की नुकसान? जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून मात केली आहे. सिडनी येथे झालेल्या या मॅचमध्ये कांगारूंनी १६० रन्सचे साधे लक्ष्य यशस्वीपणे गाठत ही मालिका ४-१ अशा फरकाने खिशात घातली.
advertisement
2/7
या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया ८७.५ टक्के गुणांसह अव्वल स्थानी पोहोचली आहे. २०२५-२७ च्या या सायकलमध्ये त्यांनी ८ पैकी ७ मॅच जिंकून आपले स्थान भक्कम केले आहे.
advertisement
3/7
दुसरीकडे इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली असून, या सायकलमधील त्यांचा दहा मॅचमधील हा सहावा पराभव आहे. 31.67 टक्के गुणांसह सध्या ते पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
advertisement
4/7
याउलट, टीम इंडियाची कामगिरी सध्या चिंतेचा विषय ठरत असून शुभमन गिल याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ९ मॅचमध्ये ४ विजय आणि ४ पराभवांसह सहाव्या स्थानावर संघर्ष करत आहे.  टीम इंडियाला ना फायदा झाला ना नुकसान...
advertisement
5/7
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सध्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तान भारताच्या पुढे असून ते पाचव्या स्थानी आहेत. पाकिस्तानने केवळ दोनच सामने खेळलेत.
advertisement
6/7
मॅचच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या जेकब बेथेलने १५४ रन्सची झुंजार खेळी केली, मात्र मिचेल स्टार्कने त्याला बाद करून इंग्लंडचा डाव ३४२ रन्सवर संपवला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या डावात १६० रन्सची गरज होती.
advertisement
7/7
कांगारूंनी संयमी खेळ करत ५ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी आणि बॅट्समननी दाखवलेल्या सातत्यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WTC Points Table : ॲशेस जिंकत ऑस्ट्रेलिया ठरली 'किंग', पण टीम इंडियाला फायदा की नुकसान? जाणून घ्या पाईंट्स टेबलचं समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल