Yuvraj Singh : 'आम्ही त्या रात्री...' 2011च्या वर्ल्ड कपला 14 वर्ष पूर्ण, भावनिक पोस्ट शेअर करत युवीने सांगितला 'तो' क्षण
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
Yuvraj Singh Social Media Post World Cup 2011 : 2 एप्रिल 2011 रोजी भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. युवराज सिंगने बुधवारी सोशल मीडियावर या अविस्मरणीय क्षणाबद्दल पोस्ट केली.
advertisement
1/7

भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनंतर 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता या विजयाची आठवण करून देत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
advertisement
2/7
युवराजने लिहिले, “2 एप्रिल 2011 – त्या रात्री आम्ही ते करोडो लोकांसाठी केले…आणि एका व्यक्तीसाठी ज्याने जवळपास दोन दशके भारतीय क्रिकेट आपल्या खांद्यावर घेतले.
advertisement
3/7
तो विश्वचषक केवळ एक विजय नव्हता तो एका लेजंडसाठी आमचे आभार होते. आम्ही सचिन तेंडुलकरला खेळताना बघत मोठे झालो.
advertisement
4/7
त्या रात्री, आम्ही त्याला तो हक्काचा क्षण देण्यासाठी खेळलो. 14 वर्षांनंतरही भारताचा विजय मला अजूनही अंगावर काटा आणतो. ही रात्र आम्ही कधीही विसरणार नाही.
advertisement
5/7
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. जिथे भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताकडून गंभीरने 97 धावा केल्या आणि एमएस धोनीने नाबाद 91 धावा केल्या.
advertisement
6/7
युवराजने अंतिम सामन्यात 21 धावांची नाबाद खेळी केली. त्याने दोन महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत युवराजने चमकदार कामगिरी केली. त्याने चेंडू आणि बॅट दोन्हीने चमत्कार केले.
advertisement
7/7
युवराजने स्पर्धेत एकूण 362 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने एकूण 15 विकेट्स घेतल्या. युवराजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yuvraj Singh : 'आम्ही त्या रात्री...' 2011च्या वर्ल्ड कपला 14 वर्ष पूर्ण, भावनिक पोस्ट शेअर करत युवीने सांगितला 'तो' क्षण