Whatsapp : बॉयफ्रेंड कोणाला पाठवतो सगळ्यात जास्त फोटो-व्हिडीओ? फक्त एका क्लिकमध्ये कळेल ‘ती’ व्यक्ती कोण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Whatsapp Tip : तुमच्याही मनात कधी तरी असा प्रश्न आला असेल का, “माझा बॉयफ्रेंड व्हॉट्सॲपवर सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो?” किंवा “तो फोटो-व्हिडीओ सगळ्यात जास्त कोणाला पाठवतो?”
advertisement
1/8

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनशिवाय सगळ्यांचाच एकही दिवस पूर्ण होत नाही. सकाळची गुड मॉर्निंगपासून ते रात्रीच्या गुड नाईटपर्यंत सगळं काही व्हॉट्सॲपवरच चालतं. प्रेमात असलेले कपल्स असोत किंवा नवरा–बायको, मित्र-मैत्रिणी असोत… फोटो, व्हिडीओ, रील्स, ऑडिओ, चॅट्स यांची देवाणघेवाण सतत सुरू असते.
advertisement
2/8
अशा वेळी तुमच्याही मनात कधी तरी असा प्रश्न आला असेल का, “माझा बॉयफ्रेंड व्हॉट्सॲपवर सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो?” किंवा “तो फोटो-व्हिडीओ सगळ्यात जास्त कोणाला पाठवतो?”
advertisement
3/8
हा विचार येणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी फोन तपासणं, संशय घेणं किंवा वाद घालणं गरजेचं नाही. कारण व्हॉट्सॲपमध्येच एक असं सोपं फीचर आहे, जे काही मिनिटांत हे उत्तर देऊ शकतं.
advertisement
4/8
व्हॉट्सॲपचं Manage Storage म्हणजेच स्टोरेज मॅनेजमेंट फीचर तुमच्यासाठी इथे उपयोगी ठरतं. हे फीचर नेमकं काय करतं, तर तुमच्या फोनमध्ये कोणत्या चॅटमधून किती फोटो, व्हिडीओ, ऑडिओ आणि मेसेजेस आले आहेत, याची सविस्तर माहिती दाखवतं. जिथे डेटा जास्त, तिथे संवाद जास्त. हे समीकरण इथे सहज लागू होतं.
advertisement
5/8
हे जाणून घ्यायला फार कष्ट नाहीत. फक्त व्हॉट्सॲप उघडा, वर दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि Settings मध्ये जा. तिथे Storage and Data हा पर्याय निवडा आणि मग Manage Storage वर क्लिक करा.क्षणातच तुमच्यासमोर सगळ्या चॅट्सची यादी उघडेल.
advertisement
6/8
या यादीत ज्या व्यक्तीचं नाव सगळ्यात वर दिसेल किंवा जिच्या नावासमोर सर्वाधिक MB किंवा GB डेटा दाखवला जाईल, त्याच व्यक्तीसोबत तुमच्या बॉयफ्रेंडने सगळ्यात जास्त फोटो, व्हिडीओ आणि मेसेज शेअर केलेले असतात. म्हणजेच, व्हॉट्सॲपवर तो सगळ्यात जास्त संपर्कात असलेली ‘ती’ व्यक्ती इथे उघड होते.
advertisement
7/8
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. जर अलीकडेच जुने फोटो किंवा चॅट्स डिलीट केले असतील, तर ही क्रमवारी बदलू शकते. त्यामुळे ही माहिती अंतिम सत्य नसून एक अंदाज म्हणून घ्यावी.
advertisement
8/8
तरीही, रोजच्या आयुष्यात नकळत मनात येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणारं हे फीचर अनेकांसाठी कुतूहल वाढवणारं ठरू शकतं. संशयापेक्षा संवाद नेहमीच चांगला, पण व्हॉट्सॲपचं हे छोटंसं फीचर कधी कधी मोठं ‘गुपित’ उघड करू शकतं, एवढं मात्र नक्की.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Whatsapp : बॉयफ्रेंड कोणाला पाठवतो सगळ्यात जास्त फोटो-व्हिडीओ? फक्त एका क्लिकमध्ये कळेल ‘ती’ व्यक्ती कोण