TRENDING:

Thane Pre Wedding Places : कमी बजेटमध्येही करा सिनेमॅटिक प्री-वेडिंग शूट; ठाण्यातील 'या' ठिकाणांनी जिंकले कपल्सची मनं

Last Updated:
Thane Pre Wedding Photoshoot Places : जर तुम्हाला ही प्री-वेडिंग फोटोशूट करायच आहे आणि जवळच अगदी हटके लोकेशन शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. आज तुम्हाला ठाणे स्टेशन तसेच ठाण्यातील अतिशय सुंदर प्री-वेडिंग फोटोशूट लोकेशन सांगणार आहोत.
advertisement
1/6
महागड्या लोकेशनची गरज नाही, ठाण्यातच मिळतील ड्रीम प्री-वेडिंगसाठी परफेक्ट स्पॉट
आजच्या काळात जवळपास प्रत्येक जोडपं लग्नाआधी आपल्या प्रेमाचे काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करतात. मग त्यात काहीजण मस्त अशा निसर्गरम्य ठिकाणाची निवड करतात तर काहींजणांना हटके लोकेशन हवं असतं.
advertisement
2/6
जर तुम्ही ठाण्यात राहत असाल आणि त्यात तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूटसाठी सुंदर ठिकाण शोधत असाल ,तर खाली दिलेली ठिकाणं तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
advertisement
3/6
ओवळेकर वाडी बटरफ्लाय गार्डन- ओवळेकर वाडी बटरफ्लाय गार्डन हे ठाण्यातील एक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण आहे. येथे कपल्सना निसर्गाच्या सान्निध्यात प्री-वेडिंग फोटोशूट नक्कीच करता येईल.
advertisement
4/6
जर तुम्हाला पारंपरिक ठिकाणी न जाता काही हटके लोकेशन हवं असेल, तर भातसा धरण सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. शांत पाण्याचं पसरलेलं सौंदर्य आणि हिरवीगार डोंगररांग यामुळे या ठिकाणी घेतलेले फोटो सिनेमॅटिक वाटतात. विशेषतः वाऱ्यात उडणारी साडी आणि पाण्याचं प्रतिबिंब असलेले फोटो अप्रतिम दिसतात.
advertisement
5/6
ठाण्यातलं आणखी एक रोमँटिक लोकेशन म्हणजे गायमुख चौपाटी. सूर्यास्ताच्या वेळेस समुद्रकिनारी घेतलेले फोटो तुमच्या लव्हस्टोरीला एक वेगळाच स्पर्श देतात. शांत वारा, लाटांचा आवाज आणि हातात हात घेऊन चालणारं कपल हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं नाही तर ते अधुरं वाटतं.
advertisement
6/6
ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि नैसर्गिक सौंदर्य अशा तिन्हींचा संगम म्हणजे येऊर हिल्स. हिरव्या झाडीतून जाणारे वाटा, सूर्यकिरणांनी उजळलेलं जंगल आणि उंचावरून दिसणारं ठाण्याचं दृश्य या सगळ्यामुळे फोटोशूट अगदी जिवंत वाटतं. ट्रेकिंग करताना किंवा हिल पॉईंटवर उभं राहून घेतलेले रोमँटिक शॉट्स तुमच्या आठवणीत कायम राहतील
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Thane Pre Wedding Places : कमी बजेटमध्येही करा सिनेमॅटिक प्री-वेडिंग शूट; ठाण्यातील 'या' ठिकाणांनी जिंकले कपल्सची मनं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल