TRENDING:

इंटरनेटवर सर्च करताना 404 Not Found दिसणं म्हणजे काय, हा एरर कसला, दिसलं की काय करायचं?

Last Updated:
Error Code 404 Not Found : इंटरनेटवर ब्राउझ करताना अनेकदा 404 Not Found असा एरर कोड दिसतो. अनेक युझर्सना हा एरर पाहून आश्चर्य वाटतं की नेमकं काय चूक झालं.
advertisement
1/6
इंटरनेटवर सर्च करताना 404 Not Found म्हणजे काय, एरर कसला, दिसलं की काय करायचं?
जेव्हा आपण ब्राउझरमध्ये एखादा यूआरएल टाइप करतो, तेव्हा ब्राउझर सर्व्हरला विनंती पाठवतो. सर्व्हरकडे त्या नावाचं किंवा लोकेशनचे पेज असल्यास तो ते पेज लोड करून देतो. पण जर फाईल अस्तित्वात नसली तर तो 404 कोडसह Not Found असा संदेश परत पाठवतो.
advertisement
2/6
प्रत्यक्षात हा मेसेज वेब सर्व्हरकडून येणारा HTTP Status Code  आहे. याचा अर्थ असा की युझरने मागितलेली वेबपेज फाईल सर्व्हरवर अस्तित्वात नाही किंवा सर्व्हरला ती सापडत नाही.
advertisement
3/6
404 एरर हा क्लायंट-साइड एरर म्हणून ओळखला जातो. म्हणजे समस्या सहसा युझर्सच्या बाजूने असते. उदा. चुकीचा URL किंवा पेज काढून टाकल्यामुळे निर्माण होतं, सर्व्हर बंद असल्यामुळे नाही.  404 एरर येण्याची सर्वात सामान्य कारणं म्हणजे URL टायपिंगमध्ये चूक, पेज डिलीट किंवा हलवलेलं असणं, ब्रोकन लिंक किंवा वेबसाईट रिमॉडेलिंग.
advertisement
4/6
कधी कधी वेबमास्टर्स जुन्या लिंककडे येणाऱ्या ट्रॅफिकसाठी योग्य रीडायरेक्ट सेट करत नाहीत; अशावेळी जुनी लिंक क्लिक केली तर 404 एरर दिसतो. त्यामुळे हा एरर इंटरनेटवरील जुन्या, expired किंवा चुकीच्या पत्त्यांसाठी खूप सामान्य आहे.
advertisement
5/6
404 एरर दिसल्यास काही सोपी पद्धत वापरून समस्या तपासता येते. सर्वप्रथम URL नीट टाइप झालाय का हे पाहावं. वेबसाईटच्या होमपेजवर जाऊन पाहिजे ते पेज शोधण्याचा प्रयत्न करावा. ब्राउझरचे कॅशे किंवा कुकीज क्लिअर करणंदेखील उपयोगी ठरते. जर लिंक खूप जुन्या लेखात दिलेली असेल, तर पेज प्रत्यक्षात हटवलेलेही असू शकते.
advertisement
6/6
डिव्हेलपर किंवा वेबसाइट मालकांच्या दृष्टिकोनातून 404 एरर हाताळणं महत्त्वाचं आहे. अनेक साईट्स आपला कस्टम 404 पेज बनवतात जिथं मैत्रीपूर्ण संदेश, सर्च बॉक्स किंवा इतर लिंक देऊन युझर्सना योग्य पेजकडे वळवता येते. त्यामुळे युझर्स साईट सोडून न जाता पुन्हा मुख्य कंटेंटकडे येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
इंटरनेटवर सर्च करताना 404 Not Found दिसणं म्हणजे काय, हा एरर कसला, दिसलं की काय करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल