TRENDING:

66,600km वेगाने येतेय पृथ्वीच्या दिशेनं विघ्न, अंतराळामध्ये हायअलर्ट, NASA ने केली डेंझर म्हणून नोंद!

Last Updated:
बऱ्याच वेळा हे लघुग्रह छोटे असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत येण्याआधीच उद्ध्वस्त होऊन जातात. पण आता  पृथ्वीशी थेट संबंध असणारी एक घटना घडली आहे.
advertisement
1/7
66,600km वेगाने येतेय पृथ्वीच्या दिशेनं विघ्न,  NASA ने केली डेंझर म्हणून नोंद!
अंतराळामध्ये नेहमी वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. अशावेळी पृथ्वीच्या दिशेनं बऱ्याच वेळा लघुग्रहाचं संकट येत असतं. बऱ्याच वेळा हे लघुग्रह छोटे असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत येण्याआधीच उद्ध्वस्त होऊन जातात. पण आता  पृथ्वीशी थेट संबंध असणारी एक घटना घडली आहे. एक धोका सध्या जगभरातील शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय आहे. हा धोका म्हणजे, पृथ्वीकडे सरकणारी एक महाकाय उल्कापिंड. जरी विश्वात अनेक उल्कापिंड असले तरी, नासाने या उल्कापिंडला धोकादायक वस्तूंच्या यादीत ठेवलं आहे.
advertisement
2/7
[caption id="attachment_1369672" align="alignnone" width="750"] यावेळी, असा महाकाय उल्कापिंड अवकाशात घिरट्या घालत आहे, ज्याबद्दल नासानेही चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या उल्कापिंडीचा वेग ताशी ६६,६०० किमी आहे आणि तो १९० फुटांपेक्षा जास्त प्रचंड आहे. शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्या प्रत्येक हालचालीचा अभ्यास केला जात आहे कारण तो पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/7
महाकाय उल्कापिंड किती मोठी?  या लघुग्रहाची लांबी सुमारे १९० फूट (५८ मीटर) आहे, जी एका बहुमजली इमारतीइतकी आहे. ती सध्या अवकाशात सुमारे ४१,३९० मैल म्हणजेच ताशी ६६,६०० किलोमीटर वेगाने फिरत आहे. या लघुग्रहाचे नाव २०२५ PM२ आहे. हा आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे कारण, अंतराळ संस्था नासाने त्याचे वर्णन संभाव्य धोका म्हणून केलं आहे. हा उल्कापिंड चंद्रापासून पृथ्वीच्या अंतराच्या फक्त १० पट अंतरावरून जाईल.
advertisement
4/7
पृथ्वीसाठी धोका किती? २०२५ PM२ बद्दल, नासा आणि इतर अंतराळ संस्थांनी स्पष्ट केलं आहे की, हा लघुग्रह सध्या पृथ्वीसाठी धोका नाही. हा एटेन नावाच्या गटाचा भाग आहे, ज्यामध्ये असे लघुग्रहांचा समावेश आहेत ज्यांची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी टक्कर घेऊ शकते. पण, सहसा ते स्थिर राहतात.
advertisement
5/7
आता प्रश्न असा आहे की, नासाने त्याला संभाव्य धोका म्हणून का पाहिले आहे. जेव्हा एखादी वस्तू ७४ लाख किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर येते आणि तिचा आकार ८५ मीटरपेक्षा जास्त असतो तेव्हा ती पृथ्वीसाठी धोका मानली जाते.
advertisement
6/7
२०२५ PM२ चा प्रचंड आकार या पॅरामीटरमध्ये येतो, परंतु त्याचे अंतर धोक्याच्या मर्यादेबाहेर आहे. म्हणूनच त्याला पृथ्वीजवळील वस्तू म्हणून पाहिले जात आहे. पृथ्वीपासून त्याचे सर्वात जवळचे अंतर २३.१ लाख मैल म्हणजेच सुमारे ३७.२ लाख किलोमीटर असेल.
advertisement
7/7
हे अंतर खूप वाटत असलं तरी अवकाशाच्या मापदंडांमध्ये ते खूप जवळचे मानलं जाते. जरी हा लघुग्रह पृथ्वीपासून सुरक्षित अंतरावरून जाणार असला तरी, अशा घटना शास्त्रज्ञांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अवकाशात थोडासा गुरुत्वाकर्षण बदल किंवा दुसऱ्या वस्तूशी टक्कर झाल्यास लघुग्रहाची दिशा बदलू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
66,600km वेगाने येतेय पृथ्वीच्या दिशेनं विघ्न, अंतराळामध्ये हायअलर्ट, NASA ने केली डेंझर म्हणून नोंद!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल