TRENDING:

Bluetooth Interesting Facts : ब्लूटूथच्या लोगोत आहेत दोन अक्षरं, आहे खास अर्थ?

Last Updated:
Bluetooth Logo Interesting Facts : ब्लूटूथ आपण वापरत आलो आहोत, वापरतो. त्याचा एक लोगो आहे, पण हा लोगो काय, त्याचा अर्थ काय? याचा विचार तुम्ही कधी केला का?
advertisement
1/7
Bluetooth Interesting Facts : ब्लूटूथच्या लोगोत आहेत दोन अक्षरं, आहे खास अर्थ?
दोन उपकरणांना जोडण्यासाठी वापरली जाणारी वायरलेस टेक्नॉलॉजी ब्लूटूथ. मोबाईल फोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आढळणारं हे फिचर जगभरात वापरलं जातं.
advertisement
2/7
1996 मध्ये इंटेल, एरिक्सन आणि नोकिया यांनी संयुक्तपणे ब्लूटूथचा शोध लावला. तेव्हा त्याला रेडिओवायर किंवा पॅन किंवा पर्सनल एरिया नेटवर्किंग असं नाव देण्यात आलं होतं. ब्लूटूथ हे नाव प्रथम आलं आणि इंटरनेटवर बरेच लोकप्रिय झालं.
advertisement
3/7
दहाव्या शतकात डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये एक राजा होता ज्याचं नाव हॅराल्ड. त्याचा एक दात मृत होता, ज्यामुळे तो निळा दिसत होता.
advertisement
4/7
डेन्मार्क आणि नॉव्रे यांना एकत्र आणणारा हॅराल्ड, लोकांना जोडण्याचं, एकत्र आणण्याचं काम त्याने केलं. डॅनिश जमातींना एका राज्यात एकत्र केलं. हॅरॉडल्डप्रमाणेच अनेक उपकरणांना जोडणारं माध्यम म्हणून त्याच्या टोपणनावावरून ब्लूटूथ हे नाव पडलं.
advertisement
5/7
ब्लूटूथचं फक्त नावच नाही तर त्याचा लोगोही खास आहे. हा लोगो नॉर्डिक रूनिक या प्राचीन भाषेतील दोन अक्षरांचं मिश्रण आहे.
advertisement
6/7
ᚼ  (Hagall / H rune) = H आणि ᛒ (Bjarkan / B rune) = B... ही दोन्ही Harald Bluetooth च्या नावातील पहिली अक्षरं आहेत.
advertisement
7/7
ही दोन्ही रून चिन्हं एकमेकांवर ओव्हरलॅप करून ठेवली आहेत, त्यामुळे आजचा आपल्याला दिसणारं Bluetooth चं चिन्ह तयार होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Bluetooth Interesting Facts : ब्लूटूथच्या लोगोत आहेत दोन अक्षरं, आहे खास अर्थ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल