Burj Khalifa : बुर्ज खलिफाचं डार्क सीक्रेट, जे अनेकांना माहितीच नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Burj Khalifa Secret : जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफाचं आकर्षण अनेकांना आहे. त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशातच बुर्ज खलिफाबाबत माहिती नसलेल्या काही गोष्टीचा दावा केला जात आहे.
advertisement
1/5

दुबईतील बुर्ज खलिफा जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग म्हणून ओळखली जाते. पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण. लक्झरी आणि लॅविश लाइफस्टाईलसाठीही चर्चेत असते. पण या बिल्डिंगचं एक डार्क सीक्रेटही आहे, जे अनेकांना माहिती नाही.
advertisement
2/5
तुम्हाला आश्चर्य वाटेल सोशल मीडियावर दावा केला जातो आहे की, लक्झरी सोयीसुविधा असलेल्या बुर्ज खलिफामध्ये सिव्हेज सिस्टम म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था नाही. जे दुबईच्या मुख्य सीवेज नेटवर्कला जोडलेलं नाही. बुर्ज खलिफाममध्ये 3500 लोक राहतात, दररोज 15 टन सांडपाणी तयार होतं. मग इतक्या सांडपाण्याचं काय करतात. तिथलं सांडपाणी कुठे जातं? तर अनेक रिपोर्टमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार ते टँकरमधून नेलं जातं.
advertisement
3/5
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोट्यवधी किमतीची ही आलिशान इमारत मग त्यात सांडपाण्याची व्यवस्था का नाही. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की बुर्ज खलिफामध्ये सुरूवातीला सीवेज व्यवस्था नव्हती कारण ते खूप खर्चिक होतं.
advertisement
4/5
ही गोष्ट 2009–2011 च्या सुरुवातीच्या काळात काही अंशी खरी होती. त्या वेळी दुबईचा बाह्य सीवेज नेटवर्क पूर्ण क्षमतेने तयार नव्हता. त्यामुळे काही मोठ्या इमारतींमधील ट्रीट केलेलं सांडपाणी टँकरद्वारे सीवेज ट्रीटमेंट प्लांटपर्यंत नेलं जात होतं हे घाण पाणी नव्हतं, तर प्राथमिक पातळीवर ट्रीट केलेलं पाणी होतं.
advertisement
5/5
टँकर सिस्टीम ही तात्पुरती आणि जुनी व्यवस्था होती. आता बुर्ज खलिफा पूर्णपणे सिटी सीवेज सिस्टमला जोडलेला आहे. इमारतीच्या आत अत्याधुनिक प्लंबिंग आणि ड्रेनेज सिस्टम आहे. प्रत्येक फ्लोअरवरून सांडपाणी खालील ट्रीटमेंट आणि पंपिंग सिस्टमकडे जातं, अशी माहिती आहे.