Chanakya Niti - परफेक्ट नवरा, बॉयफ्रेंड हवाय; मग चाणक्यनीतीतील हा 'मंत्र' लक्षात ठेवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
पुरुष चांगला की वाईट हे कसं ओळखायचं हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
advertisement
1/7

अशी कितीतरी प्रकरणं आहेत ज्यात पुरुष महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, लग्न करून फसवणूक करतात. वरून वरून चांगला वाटणारा पुरुष प्रत्यक्षात मात्र वेगळाच असतो.
advertisement
2/7
पण मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याशी लग्न करणार तो पुरुष चांगला आहे की नाही हे कसं ओळखायचं? हे <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये सांगितलं आहे. नवरा असो बॉयफ्रेंड तो चांगला आहे की नाही हे ओळखण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्यातील काही गुण सांगितले आहेत.
advertisement
3/7
व्यक्तीची पारख त्याच्या गुणांवरून होते. व्यक्तीचे गुणच त्याचं आचरण दाखवतात. त्यामुळे कोणत्याही पुरुषाला ओळखण्यासाठी त्याच्यातील चार गुणांची पारख करा. चांगल्या पुरुषांमध्ये हे चार गुण असतात.
advertisement
4/7
दान नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी केलं जातं. जे पैशांचाचं असलं पाहिजे असं नाही. एखादा पुरुष नि:स्वार्थपणे कुणाचीही कोणत्याही प्रकारे मदत करत असेल तरी ते दानच आहे. दानाची भावना त्याच्यातील चांगुलपणा दर्शवतं.
advertisement
5/7
सामान्यपणे महिलांमध्ये शीलता असावी असं म्हणतात. पण ती तितकीच पुरुषांमध्येही गरजेची आहे. सज्जन, संस्कारी, सुशील, सदाचारी पुरुषाला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. त्यांचा हा गुणही त्यांच्यातील चांगलेपणा दाखवतो.
advertisement
6/7
व्यक्ती गुणी आहे की नाही हे त्याच्या वागणुकीवरूनच कळतं. व्यक्तीचं चालणं, बोलणं, वागणं खूप काही सांगतं. ते तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला गुणी आणि अवगुणी पुरुष समजून येईल.
advertisement
7/7
कोणत्याही पुरुषाला भेटाल तेव्हा त्याच्या व्यवहाराकडे लक्ष द्या. त्यातून त्याचं आचरण समजेल. चांगल्या आचरणाचे पुरुष सामाजिक आणि सर्वांमध्ये मिसळणारे असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti - परफेक्ट नवरा, बॉयफ्रेंड हवाय; मग चाणक्यनीतीतील हा 'मंत्र' लक्षात ठेवा