Chanakya Niti - अशा 5 गोष्टी ज्या नवरा-बायकोनं रात्री झोपण्याआधी जरूर कराव्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
पती-पत्नीनं ही पाच कामं दररोज रात्री झोपण्याआधी करावीत, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.
advertisement
1/6

आचार्य चाणक्य यांनी <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये सुखी वैवाहिक आयुष्याचेही काही मंत्र दिले आहेत. अशाच मंत्रांपैकी हे काही मंत्र. ज्यात त्यांनी कपलला रात्री झोपण्यापूर्वी 5 गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
2/6
नवरा-बायकोनं रात्रीचं जेवण एकत्र करावं. शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हातांनी भरवावं. असं केल्यानं दोघांमध्ये प्रेम वाढतंच. सोबतच एकमेकां प्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो.
advertisement
3/6
जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असं केल्यानं तुमच्यातील दुरावा वाढू शकतो. त्यामुळे अशी चूक होणार नाही, यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
advertisement
4/6
नवरा-बायकोने थोडं एकमेकांशी गप्पा मारून मग झोपावं, कारण दिवसभर ते कामात व्यस्त असतात. एकमेकांसाठी आणि स्वतःला वेळ देता येत नाही. त्यामुळे एकमेकांशी झोपण्याआधी थोडं बोलावं.
advertisement
5/6
जर रात्री झोपण्याआधी पत्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ती ऐकून घ्यावी. कदाचित सासरी ती मोठ्या समस्येतून जात असावी आणि ती कुणासोबत ते शेअर करू शकत नसेल. तर तिची समस्या ऐकून त्याचं निराकारण करणं हा पतीचा धर्मच आहे.
advertisement
6/6
बेडरूममध्ये गेल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना मिठी जरूर मारावी. असं केल्यानं त्यांना आनंद मिळतो. यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढतं. त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti - अशा 5 गोष्टी ज्या नवरा-बायकोनं रात्री झोपण्याआधी जरूर कराव्यात