TRENDING:

Petrol : 1 लिटर पेट्रोलमागे पंपच्या मालकाला किती पैसे मिळतात? कसे कमावतात पेट्रोल पंपवाले?

Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण ज्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरतो, त्या पंप मालकाची कमाई किती होत असेल? किंवा तो किती पैसे कमावत असेल?
advertisement
1/6
1 लिटर पेट्रोलमागे पंपच्या मालकाला किती पैसे मिळतात? कसे कमावतात पेट्रोल पंपवाले
सध्या भारतीय लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. यामुळे प्रदुषण तर कमी होतंच शिवाय पेट्रोल-डिझेलची देखील बचत होते. पण असं असलं तरी भारतीय रस्त्यांवर आजही अनेक पेट्रोल-डिझेलवर चालणारे वाहानं आहेत. लोक दररोज किंवा आपल्या गरजे प्रमाणे एकदाच पेट्रोल किंवा डिझेल आपल्या गाडीत भरतात.
advertisement
2/6
तसे पाहाता पेट्रोल-डिझेलचे दर चढ-उतार करत असतात. पण मागच्या बऱ्याच महिन्यांपासून हे दर बदलले नाहीत.
advertisement
3/6
विविध राज्यांमध्ये तेथील स्थानिक कर आणि शुल्क यामुळे पेट्रोलचे दरही वेगळे असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण ज्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरतो, त्या पंप मालकाची कमाई किती होत असेल? किंवा तो किती पैसे कमावत असेल?
advertisement
4/6
त्यासाठी आधी त्याची प्रोसेस जाणून घेऊ आणि त्याद्वारे किती प्रॉफिट होतो हे पाहू. पेट्रोल प्रथम कच्च्या स्वरूपात भारतात येते. त्यानंतर त्याचे रिफायनिंग केले जाते. या प्रक्रियेत रिफायनिंग खर्च, वाहतूक खर्च, एंट्री टॅक्स यांसारखे अनेक खर्च पेट्रोलच्या अंतिम दरात समाविष्ट होतात.
advertisement
5/6
सरकार पेट्रोलपंप डीलरला प्रति लिटर पेट्रोलवर सुमारे ₹3.66 इतके कमिशन देते. तर डिझेलसाठी प्रति लिटर सुमारे ₹1.85 इतके कमिशन मिळते. हे दर वेळोवेळी सरकारकडून बदलले जाऊ शकतात.
advertisement
6/6
उदाहरणार्थ, जर एखाद्या छोट्या पेट्रोलपंपावर दिवसाला 1,000 लिटर पेट्रोल विकले जात असेल, तर 3.66 रुपये प्रति लिटर कमिशननुसार दिवसाची कमाई 1,000 × 3.66 = ₹3,660 इतकी होते. याप्रमाणे, महिन्याची कमाई 3,660 × 30 = ₹1,09,800 इतकी होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Petrol : 1 लिटर पेट्रोलमागे पंपच्या मालकाला किती पैसे मिळतात? कसे कमावतात पेट्रोल पंपवाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल