TRENDING:

भारतातील अद्भुत ठिकाण, जिथं दर 15 दिवसांनी फुलं रंग बदलतात; पाहा PHOTO

Last Updated:
तुम्ही रंगबेरंगी फुलं पाहिली असतील पण रंग बदलणाऱ्या फुलांबाबत तुम्ही कधी ऐकलं होतं का? भारतात असं एक ठिकाण आहे, जिथं फुलं आपला रंग बदलतात.
advertisement
1/5
भारतातील अद्भुत ठिकाण, जिथं दर 15 दिवसांनी फुलं रंग बदलतात; पाहा PHOTO
फुलांनी बहरलेलं ठिकाण म्हटलं की तुमच्यासमोर ते कास पठार. साताऱ्यातील कास पठार तुम्हाला माहितीच आहे. पण भारतात असं एक ठिकाण आहे, जे फुलांसाठी प्रसिद्ध आहे आश्चर्य म्हणजे इथं दर 15 दिवसांनी फुलं आपला रंग बदलतात. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण. दरवर्षी जगभरातून पर्यटक इथं भेट देण्यासाठी येतात.
advertisement
2/5
87.5 स्क्वेअर किलोमीटर पसरलेली ही व्हॅली. इथं तुम्हाला फुलांच्या किमान 500 पेक्षा जास्त प्रजाती पाहायला मिळतील. ज्यामध्ये अनेक विदेशी फुलांचाही समावेश आहे. या व्हॅलीने जागतिक वारसा यादीतही स्थान मिळवलं आहे.
advertisement
3/5
या दरीचा शोध वनस्पतिशास्त्रज्ञ फ्रँक सिडनी स्मिथ यांनी लावला. गिर्यारोहणासाठी बाहेर पडल्यावर ते चुकून या दरीजवळ पोहोचले. फ्रँकने यांनी यावर  एक पुस्तक लिहिलं आहे, या पुस्तकात त्यांनी व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधील फुलांचा रंग दर 15 दिवसांनी बदलत असल्याचं नमूद केलं आहे.
advertisement
4/5
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स वर्षभरात फक्त 3 ते 4 महिनेच पर्यटकांसाठी खुली असते. 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत इथं पर्यटक येतात. या ऋतूत दूरवर फक्त फुलेच दिसतील.
advertisement
5/5
उत्तराखंडमधील चमोली इथं हे ठिकाण आहे. इथं जाण्यासाठी बद्रीनाथ महामार्गावरून गोविंदघाटाकडे जावं लागेल. तिथून पुलना पर्यंत रस्त्याने 3 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर हेमकुंड यात्रेच्या बेस कॅम्पमार्गे घाघरियाला जाण्यासाठी !1 किमी पायी प्रवास करावा लागतो. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. नोंदणी शुल्क म्हणून भारतीयांना 150 रुपये आणि परदेशींना 600 रुपये आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
भारतातील अद्भुत ठिकाण, जिथं दर 15 दिवसांनी फुलं रंग बदलतात; पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल