100 टक्के लॉटरी लागणारच! कोट्यवधी जिंकण्याची हमी, 2 प्राध्यापकांनी दिला जबरदस्त फॉर्म्युला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Lottery winning formula : तुम्ही लॉटरीची तिकिटं खरेदी करता का? तुम्ही लॉटरीचा जॅकपॉट जिंकण्याचं स्वप्न पाहता का? पण नशीब साथ देत नाही, तर लॉटरीचं तिकीट जिंकण्याचं हमी देणारा फॉर्म्युला प्राध्यापकांनी दिला आहे.
advertisement
1/7

आपण श्रीमंत व्हावं असं कुणाला वाटत नाही. झटपट श्रीमंत होण्यासाठी कित्येक लोक लॉटरीचं तिकीट खरेदी करतात. पण इथं नशीबाची साथ लागते. पण आता दोन प्राध्यापकांनी असा फॉर्म्युला दिला आहे की लॉटरीचं तिकीट 100 टक्के जिंकण्याची हमी त्यांनी दिली आहे.
advertisement
2/7
यावेळी ही तथाकथित कल्पना किंवा मिथक नाही, दोन परदेशी प्राध्यापकांनी लॉटरी जिंकण्यासाठी अशी माहिती पुढे आणली आहे, त्यानुसार जर तुम्ही ती विशिष्ट लॉटरी खरेदी केली आणि खेळली तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
advertisement
3/7
डेव्हिड स्टीवर्ट आणि डेव्हिड क्रशिंग ब्रिटनमधील हे दोन गणितज्ञ जे मँचेस्टर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी ब्रिटिश नॅशनल लॉटरी जिंकण्याचा मार्ग शोधला आहे. या दोघांनी दाखवून दिलं आहे की जर तुम्ही किमान 27 लॉटरी तिकिटं खरेदी केली तर तुम्हाला लॉटरी जिंकण्याची हमी आहे.
advertisement
4/7
त्यांचा दावा आहे की तुम्ही किमान 27 लॉटरी तिकिटं खरेदी केल्यास बक्षीस मिळण्याची हमी आहे. 45 दशलक्ष शक्यतांपैकी 27 तिकिटं निवडून जिंकणं शक्य आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांनी स्वतःचे संशोधन देखील युक्तिवाद म्हणून दिले.
advertisement
5/7
दोन्ही गणितज्ञ म्हणाले, "यूके नॅशनल लॉटरीत 6 वेगवेगळे आकडे आहेत. ते 1 ते 59 दरम्यान आहेत. या आकड्यांमधून 6 आकडे निवडले जातात. बक्षीस मिळवण्यासाठी, 6 आकड्यांपैकी किमान 2 आकडे जुळले पाहिजेत. आम्ही पाहिले आहे की 45 दशलक्ष शक्यतांपैकी 27 तिकिटं बक्षीसाची हमी देऊ शकतात. परंतु 26 तिकिटांसह ही हमी देणं शक्य नाही."
advertisement
6/7
27 आकड्यांपैकी कोणता आकडा निवडायचा हे निवडण्याची एक रणनीती आहे. जर तुम्ही त्या खास रणनीतीचा अवलंब करून लॉटरीची तिकिटं खरेदी करू शकत असाल तर तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकते.
advertisement
7/7
तथापि, लॉटरी जिंकण्याचा योग्य मार्ग आणि इतक्या युक्त्या जाणून घेतल्यानंतरही तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, लॉटरी हा नशिबाचा खेळ आहे आणि लॉटरी निवडीला व्यसनात बदलू नये हे चांगलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
100 टक्के लॉटरी लागणारच! कोट्यवधी जिंकण्याची हमी, 2 प्राध्यापकांनी दिला जबरदस्त फॉर्म्युला