TRENDING:

Mahakumbh 2025 Female Naga Sadhu : महिला नागा साधू होणं सोप्पं नाही, असं काय काय करावं लागतं तुम्ही कल्पनाही करू शकत नाही

Last Updated:
नागा साधूंचं आयुष्य अत्यंत कठीण असतं. नागा साधू बनणं हेदेखील अवघड असतं. त्यासाठी त्यांना अनेक पारंपरिक धार्मिक आव्हानं पेलावी लागतात व परीक्षा द्याव्या लागतात. याआधी केवळ पुरुषच नागा साधू बनू शकत होते; मात्र काही दशकांपूर्वी महिलांनाही नागा साध्वी बनण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर देशात अनेक महिला नागा साध्वी बनल्या.
advertisement
1/9
महिला नागा साधू होणं सोप्पं नाही, असं काही करावं लागतं कल्पनाही करू शकत नाही
नागा साधू म्हटलं की शरीराला भस्म फासून लांब जटा असलेली व्यक्ती डोळ्यासमोर येते; पण फक्त पुरुषच नागा साधू बनतात, असा तुमचा समज असेल तर तो तसं नाही. कारण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की महिला नागा साधूही असतात. त्यासाठी त्यांना खूपच कठीण नियम पाळावे लागतात.
advertisement
2/9
नागा साध्वी बनण्याआधी महिलेच्या आयुष्याची माहिती मिळवली जाते. ती पूर्णपणे देवाला समर्पित आहे का? साध्वी बनण्याची कठीण साधना ती करू शकते का? हे जाणून घेण्यासाठी ती माहिती घेतली जाते.
advertisement
3/9
सांसारिक जीवनातून ती मुक्त झाली आहे, याचा निर्वाळा महिलेला या परीक्षेत द्यावा लागतो. आतापर्यंतच्या आयुष्याशी आता तिचा कोणताही संबंध नाही हे महिलेला दाखवून द्यावं लागतं. सगळ्या नात्यांपासून ती दूर आली आहे, हे तिला सिद्ध करावं लागतं. तसंच कोणत्याही सोयीसुविधांशिवाय जगण्याची तिला सवय आहे हेही सिद्ध करावं लागतं. सांसारिक जीवनातली मोहमाया, सुखदुःखांपासून तिला दूर व्हावं लागतं, तरच ती महिला नागा साध्वी बनण्यासाठी पात्र होते.
advertisement
4/9
नागा साधू बनण्याआधी महिलेला अनेक कठीण परीक्षा द्याव्या लागतात. 6 ते 12 वर्षे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. त्यात यशस्वी झाल्यास त्यांचे गुरू त्यांना नागा साधू बनण्याची परवानगी देतात. पहिली दहा वर्षं महिलेला कठीण प्रशिक्षण घ्यावं लागतं.
advertisement
5/9
यात डोक्यावरचे केस काढावे लागतात. त्यांच्या कपाळावर एक टिळा लावावा लागतो. अंगावर केशरी रंगाचं, लांब, न शिवलेलं वस्त्र घालण्याची परवानगी असते. त्यांना केवळ एकच वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते, एक हत्यारही महिलेला देतात. अतिशय साधं जीवन जगतात. साधं अन्न त्या खातात व नेहमी जमिनीवर झोपतात. त्यासाठी चादर किंवा चटईचा वापर त्या करतात.
advertisement
6/9
नागा साध्वी बनण्याआधी स्वतःचं पिंडदान करावं लागतं. हिंदू धर्मात मृत्यूनंतर पिंडदान केलं जातं; मात्र नागा साध्वी बनण्यासाठी महिलेला तिनं आजवर जगलेलं आयुष्य आणि तिची ओळख पुसून टाकायची असते. त्यासाठी तिला पिंडदान करावं लागतं. त्यानंतर त्या नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात.
advertisement
7/9
सर्वसाधारण महिलेचा नागा साध्वी बनण्याचा हा प्रवास असतो. आखाड्यांचे सर्वोच्च पदाधिकारी आचार्य महामंडलेश्वर यांच्यातर्फे महिलांची संन्यासी बनण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. परीक्षा पूर्ण झाल्यावर नागा साध्वी ‘मां’ किंवा माता म्हणून ओळखल्या जातात.
advertisement
8/9
या नागा साध्वी इतर वेळी सर्वसामान्यांच्या समोर येत नाहीत. केवळ कुंभमेळ्यांमध्ये त्या लोकांसमोर येतात. नागा साध्वींनाही पुरुष नागा साधूंइतकाच आदर व मान सन्मान मिळतो. कुंभमेळ्यामध्ये नागा साध्वी इतर साध्वींसह स्नान करतात. महिलांच्या स्नान करण्याच्या ठिकाणी पुरुष नागा साधूंना जाण्यास बंदी असते. पुरुष नागा साधूंचं स्नान झाल्यावर महिलाचं स्नान होतं. कुंभमेळ्यात शाही जुलूस निघाल्यावर पुरुष नागा साधूंच्या दलाच्या मागे नागा साध्वी निघतात.
advertisement
9/9
भारतातल्या नागा साध्वी परंपरेनं परदेशातल्या महिलांनाही त्याकडे आकर्षित केलं आहे. नागा साधूंवर सनातन धर्माचं आणि वैदिक परंपरांचं रक्षण करण्याची जबाबदारी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mahakumbh 2025 Female Naga Sadhu : महिला नागा साधू होणं सोप्पं नाही, असं काय काय करावं लागतं तुम्ही कल्पनाही करू शकत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल