भिंतीखाली दिसला चेहरा, चमकत होते डोळे; हिंमत करून व्यक्तीने हात टाकला अन्...
- Published by:Priya Lad
Last Updated:
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात भिंतीखाली डोळे चमकताना दिसत आहेत. याचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीनं केला.
advertisement
1/7

तुमच्या घरात तुम्हाला एखाद्या ठिकाणी दोन डोळे चमकताना दिसलं तर तुमचं काय होईल? कल्पनाही नकोशी वाटते ना. एका व्यक्तीच्या घरात असं घडलं.
advertisement
2/7
खिडकीच्या भिंतीखाली या व्यक्तीला दोन डोळे चमकताना दिसलं. व्यक्ती घाबरली होती पण ते काय हे पाहण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीनं हिंमत करून तिथं हात टाकला.
advertisement
3/7
भिंतीखाली चमकणाऱ्या डोळ्यांचं रहस्य असं की व्यक्तीने विचारही केला नव्हता. तो चेहरा आणि ते चमकणारे डोळे दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे तर घुबडाचे होते.
advertisement
4/7
घुबडाचं संपूर्ण कुटुंब तिथं होतं. घुबड आपल्या पिल्लांसोबत तिथं राहत होतं. आपल्या पिल्लांचं पोट भरण्यासाठी आई घुबडाची धडपड सुरू होती.
advertisement
5/7
व्यक्तीने त्या घुबडांना पाहिलं. त्यांची अवस्था पाहिल्यानंतर त्याला त्यांच्यावर दया आली. त्यानं त्या घुबडांना तिथंच ठेवलं आणि त्यांना खाऊपिऊ घातलं.
advertisement
6/7
हळूहळू घुबडं मोठी झाली. घुबडांचा त्या व्यक्तीवरही विश्वास बसला. मोठी झाल्यानंतर ही घुबडं त्या व्यक्तीच्या घरातही येऊ लागली.
advertisement
7/7
व्यक्तीनं सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. सर्वांनी या व्यक्तीच्या कृत्याचं कौतुक केलं आहे. घुबडांच्या डोळ्यांनीही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
भिंतीखाली दिसला चेहरा, चमकत होते डोळे; हिंमत करून व्यक्तीने हात टाकला अन्...