Animal Facts : एक पक्षी जो जंगलाच्या राजाचा 'काळ', लाथ मारून घेतो सिंहाचा जीव
- Published by:Priya Lad
Last Updated:
Lion facts : जंगलाचा राज सिंह ज्याला हरवण्याची, ज्याच्याशी लढण्याची ताकद काही प्राण्यांमध्ये आहे. अगदी एका पक्ष्याचाही यात समावेश आहे.
advertisement
1/7

सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंह हा शक्तिशाली असण्यासोबतच एक कुशल शिकारीदेखील आहे. पण सिंहाला हरवणारे कोणीच नाही असं नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही एक असा पक्षी जो सिंहाचा काळ ठरतो.
advertisement
2/7
जंगलाचा राजा सिंह ज्याचा सगळ्यात पहिला शत्रू दुसरा सिंहच असतो. आपलं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून एक सिंह दुसऱ्या सिंहाशी भिडतो. ही लढाई बहुतेक नरांमध्ये होते. बऱ्याच वेळा ही लढाई एका सिंहाच्या मृत्यूपर्यंत चालू राहते.
advertisement
3/7
सिंहाचा दुसरा शत्रू तरस. जरी हा प्राणी मैला साफ करण्यासाठी ओळखला जात असला तरी तो एक चांगला शिकारी देखील आहे. बऱ्याच वेळा तरस सिंहाशी भिडतो. एकटा तरस सिंहासमोर उभा राहू शकत नाही पण जेव्हा ते समूहात असतात तेव्हा ते सिंहासारख्या शक्तिशाली प्राण्यालाही धडा शिकवतात.
advertisement
4/7
हत्ती देखील सिंहासाठी समस्या बनतात. बहुतेक सिंह हत्तींशी पंगा घेत नाही. पण कधीकधी या दोन प्राण्यांमध्ये भयंकर चकमकी पाहायला मिळतात. हत्ती खूप मोठा असल्याने आणि त्याच्या शरीराची ताकदही जास्त असल्याने सिंहाला पराभवाला सामोरं जावं लागतं.
advertisement
5/7
म्हशी तशा शांत आणि सुस्त दिसत असल्या तरी जेव्हा त्या संकटात असतात तेव्हा त्या क्रूर रूप धारण करतात आणि सिंहासारख्या प्राण्यांनाही हरवू शकतात. एकटी म्हैस सिंहाशी लढणं शक्य नाही पण जेव्हा त्या एकापेक्षा जास्त कळपात असतात तेव्हा ते अनेक वेळा सिंहाचा पराभव करतात.
advertisement
6/7
सिंहाचा आणखी एक शत्रू म्हणजे पाणघोडा. जो मांस खात नसला तरी त्याचा मोठा जबडा त्याला अधिक धोकादायक बनवतो. त्यांच्या मोठ्या जबड्यांमुळे ते सर्वात मजबूत वस्तूंनाही तोडू शकतात. जेव्हा हा प्राणी भडकतो तेव्हा तो सिंहाला हरवू शकतो.
advertisement
7/7
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे असा एक पक्षी जो सिंहाला हरवू शकतो. हा पक्षी मार्शल ईगल आहे. या गरुडाचा पंख 6 फूटपर्यंत पसरतो. नॅशनल जिओग्राफिकने या पक्ष्यांबद्दल दिलेल्या माहितीनुसार हे पक्षी तरुण सिंहांची शिकार करू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Animal Facts : एक पक्षी जो जंगलाच्या राजाचा 'काळ', लाथ मारून घेतो सिंहाचा जीव