कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी नाही हा ट्रान्सजेंडर, मोहित बनून केलं लग्न, पण आता आला मोठा ट्विस्ट
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
बिहारमधला एक तरुण अतिशय सुंदर दिसणाऱ्या एका ट्रान्सजेंडरच्या (तृतीयपंथीय) प्रेमात पडला. दोघांनी लग्नही केलं; मात्र आता तरुणाचे कुटुंबीय त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.
advertisement
1/7

बिहारमधल्या दानापूर इथे एक विचित्र प्रकरण घडलं आहे. तिथे आरपीएस आर्य समाज रोडवरच्या लाल मुनी एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या रवी नावाच्या तरुणाने एका तरुणीशी लग्न केल्याचा सर्वांचा समज होता; मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती स्त्री नसून दरभंगा इथे राहणारी तृतीयपंथीय व्यक्ती अर्थात ट्रान्सजेंडर आहे. या ट्रान्सजेंडरचं नाव अध्विका असं आहे.
advertisement
2/7
ही बाब उघड झाल्यानंतर रवीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला आहे. त्यामुळे रवीने दानापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुटुंबीयांनी आपल्या पत्नीवर बलात्कार केला आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे आरोप रवीने केले आहेत.
advertisement
3/7
दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली आणि ते प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन हिंदू रीतिरिवाजांनुसार लग्न केलं. रविकुमार हा सत्येंद्र सिंह या राजकीय नेत्याचा मुलगा आहे. रविकुमारने सांगितलं, की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर अध्विका चौधरी सिंहशी त्याची मैत्री झाली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी 25 जून रोजी प्रेमविवाह केला.
advertisement
4/7
त्याच्या या निर्णयाने कुटुंबीय संतप्त झाले आहेत. वडील व भावाकडून छळ होत असल्याने जिवाच्या भीतीने रवी आणि त्याच्या पत्नीने दानापूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी अर्ज देऊन मदतीची मागणी केली. पोलिसांनी हे प्रकरण हातात घेतलं आहे.
advertisement
5/7
रवीचं म्हणणं आहे, की वडील सत्येंद्र सिंह आणि भाऊ धनंजय कुमार यांनी लग्नानंतर त्याच्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. अपशब्द बोलून तिचा अपमान केला. पती-पत्नीला दररोज जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. हुंडा म्हणून तिच्याकडे 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास तिचं अपहरण करून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे.
advertisement
6/7
आरोपानुसार, 13 जुलै रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी त्यांचा पाठलाग केला होता. दोघंही आपला जीव वाचवत फिरत आहेत. रवीने सांगितलं, की आपली ट्रान्सजेंडर पत्नी बिहार पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करत आहे. दोघांनी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन अॅक्ट 2019 अंतर्गत पोलिसांकडे संरक्षण मागितलं आहे.
advertisement
7/7
हे प्रकरण दाखल झाल्यानंतर दानापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ट्रान्सजेंडर अध्विका चौधरी यांनी सांगितलं, की प्रेमात पडून त्यांनी मंदिरात लग्न केलं; पण आता सासरच्या घरी राहू दिलं जात नाही. विविध प्रकारे अपमानित केलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी नाही हा ट्रान्सजेंडर, मोहित बनून केलं लग्न, पण आता आला मोठा ट्विस्ट