TRENDING:

Snake Fact : अंडी देणारा का पिल्लं देणारा, कोणता साप जास्त विषारी? सापासंबंधी हे गैरसमज आत्ताच दूर करा

Last Updated:
एक प्रश्न नेहमी अनेकांच्या मनात उद्भवतो की अंडी देणारा की पिल्लांना जन्म देणारा कोणता साप जास्त धोकादायक?
advertisement
1/10
अंडी देणारा का पिल्लं देणारा, कोणता साप जास्त विषारी? हे गैरसमज आत्ताच दूर करा
सापांबद्दल लोकांमध्ये नेहमीच भीती आणि कुतूहल असतं. जगभरात हजारो प्रजाती असलेल्या सापांपैकी फक्त काहीच प्रजाती विषारी असतात. तरीदेखील सापांची भीती लोकांना मनात कायम आहे.
advertisement
2/10
यामुळे एक प्रश्न नेहमी अनेकांच्या मनात उद्भवतो की अंडी देणारा की पिल्लांना जन्म देणारा कोणता साप जास्त धोकादायक? तुम्हाला ही असा प्रश्न पडलाय का किंवा या बातमीची हेडलाइन वाचल्यानंतर असा प्रश्न मनात उपस्थीत झाला का? चला मग याचं उत्तर थेट तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.
advertisement
3/10
साप हे प्रजननाच्या दोन प्रकारांतून आपली संतती वाढवतात, त्यांपैकी काही साप अंडी देतात (Oviparous) तर काही थेट जिवंत पिल्लांना जन्म देतात (Viviparous).
advertisement
4/10
पण साप किती धोकादायक आहे हे त्याच्या प्रजनन पद्धतीवर अवलंबून नसतं, तर त्या सापाच्या विषाची तीव्रता, प्रमाण, आक्रमक स्वभाव आणि दंश करण्याची क्षमता यावर अवलंबून असतं.
advertisement
5/10
अंडी देणारे सापकोब्रा, किंग कोब्रा, उंदीरसाप, अजगर (Python) आणि गार्टर स्नेक हे अंडी देणाऱ्या सापांच्या गटात मोडतात. हे साप सुरक्षित आणि उबदार ठिकाणी एकावेळी अनेक अंडी देतात. कोब्रा आणि किंग कोब्रा हे अंडी देणारे असूनसुद्धा जगातील अत्यंत विषारी सापांमध्ये गणले जातात.
advertisement
6/10
पिल्लांना जन्म देणारे सापवायपर, रॅटलस्नेक, गिलनॉस स्नेक आणि बोआ कन्स्ट्रिक्टर हे साप अंडी न देता थेट पिल्लांना जन्म देतात. यामध्ये भ्रूण आईच्या शरीरात विकसित होतो आणि नंतर बाहेर येतो. वायपर आणि रॅटलस्नेकसारखे सापही अतिशय विषारी आणि धोकादायक असतात.
advertisement
7/10
स्नेक कॅचर आणि साप तज्ज्ञ महादेव पाटील यांच्या मते, सापाचं विष किती विषारी हे त्याने अंडी दिली का पिल्लं दिली यावर ठरत नाही तर त्याच्या विषाची ताकद, दंश करण्याची क्षमता आणि आक्रमकतेवर ठरतं.
advertisement
8/10
बेबी कोब्रा विशेषतः धोकादायक मानला जातो कारण तो दंश करताना विषाचं प्रमाण नियंत्रित करू शकत नाही आणि एकाच वेळी पूर्ण विष सोडतो, ज्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.
advertisement
9/10
आता सापां संबंधीत आणखी मिथकं आणि सत्य जाणून घेऊ
advertisement
10/10
मिथक: पिल्लं देणाऱ्या सापांमध्ये हजारपट जास्त विष असतं.सत्य: विषाचं प्रमाण प्रत्येक प्रजातीप्रमाणे बदलतं, प्रजनन पद्धतीशी त्याचा संबंध नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Fact : अंडी देणारा का पिल्लं देणारा, कोणता साप जास्त विषारी? सापासंबंधी हे गैरसमज आत्ताच दूर करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल