TRENDING:

Suhagraat : दुधाचा ग्लास, फुलांनी सजवलेला बेड आणि लाजणारी नवरी, अजब आहे सुहागरातची रिअल स्टोरी

Last Updated:
Suhagraat Story : लग्नातील प्रत्येक विधीचा एक अर्थ आणि महत्त्व आहे. त्यापैकीच एक म्हणजे सुहागरात, ज्याची फिल्म, साहित्य आणि समाजात वेगवेगळी प्रतीमा आहे. जाणून घेऊया 'सुहागरात'ची रिअल स्टोरी.
advertisement
1/9
दुधाचा ग्लास, फुलांनी सजवलेला बेड, लाजणारी नवरी, अजब आहे सुहागरातची रिअल स्टोरी
'सुहागरात' हा शब्द 'सुहाग' आणि 'रात' या दोन शब्दांपासून बनलेला आहे. सुहाग हा शब्द संस्कृत शब्द 'सौभाग्य' किंवा 'सुभाग्य'पासून आला आहे. याचा अर्थ स्त्रीचं वैवाहिक सौभाग्य, पतीचं दीर्घायुष्य आणि त्याचा आनंद असा होतो. रात म्हणजे रात्र, म्हणजेच लग्नानंतरची पहिली रात्र.
advertisement
2/9
म्हणून, 'सुहागरात'चा शब्दश: अर्थ वैवाहिक सौभाग्याची पहिली रात्र असा आहे.  ज्यामध्ये पती-पत्नी एकमेकांच्या खूप जवळ येतात.
advertisement
3/9
मध्ययुगीन काळात, विशेषतः मुघल आणि राजपूत राजघराण्यांमध्ये लग्नाला भव्य स्वरूप देण्यासोबतच सुहागरातचा एक विधी बनवण्यात आला. वधूला गुलाबांनी सजवलेल्या पलंगावर घेऊन जाणं, सुगंधी द्रव्य लावणं, लाजणाऱ्या नवरीला वराच्या शेजारी बसवणं, या सर्व त्या काळातील परंपरा होत्या.
advertisement
4/9
ब्रिटिश काळात व्हिक्टोरियन विचारसरणी आणि भारतीय परंपरेच्या संयोजनामुळे सुहागरात अधिक 'भावनिक आणि पवित्र' बनलं. आता ती फक्त एक रात्र राहिली नाही तर एक विधी बनला.
advertisement
5/9
चित्रपट आणि साहित्याने सुहागरातची प्रतिमा बदलली. विसाव्या शतकातील चित्रपटांनी 'सुहागरात'ला एक नवीन रंग दिला. फुलांनी सजवलेला पलंग, दुधाचा ग्लास, लाजेने मान खाली घालून बसलेली वधू, बांगड्यांचा आवाज, घुंगटमागे लपलेलं हास्य. या सर्वांमुळे सुहागरात प्रेम, गूढता आणि विधी यांचं मिश्रण बनल. चित्रपटांमध्ये ते संस्कार आणि कामुकतेचं मिश्रण म्हणून दाखवलं जात राहिलं, ज्यामुळे त्याची प्रतिमा लोकांच्या मनात घट्ट बसली.
advertisement
6/9
आधुनिक विचारसरणीत, आजच्या युगात 'सुहागरात' हे सांस्कृतिक प्रतीकापेक्षा वैयक्तिक अनुभव बनलं आहे. आता अनेक जोडपी लग्नापूर्वीच भावनिक किंवा शारीरिकदृष्ट्या जोडलेली असतात, अशा परिस्थितीत सुहागरात एक औपचारिकता बनत चालली आहे.
advertisement
7/9
शहरी तरुणांमध्ये याचा अर्थ फक्त बेडवर फुलं पसरवणं असा होत नाही, तर जोडीदारासोबत नवीन जीवनाची सुरुवात असा होतो. परंतु ग्रामीण भारतात आणि पारंपारिक कुटुंबांमध्ये आजही हा विधी तितकाच खास, गूढ आणि तितकाच प्रतीकात्मक आहे.
advertisement
8/9
'सुहागरात'शी संबंधित फुलांचा पलंग ज्यावरील फुल सौंदर्य, पवित्रता आणि कामुकतेचे प्रतीक मानली जातात. सुहागरातला नवरी नवरदेवाला देत असलेली दुधाचा ग्लास म्हणजे ऊर्जा, शक्ती आणि प्रेमाचं प्रतीक. नवरीच्या डोक्यावरील घुंगट म्हणजे नम्रता, संस्कार आणि प्रतिष्ठेचे प्रतीक.
advertisement
9/9
हे सर्व केवळ विधी नाहीत, तर नवविवाहित जोडप्याच्या मानसिक आणि भावनिक प्रवासातील टप्पे आहेत. 'सुहागरात' ही केवळ एका रात्रीची नाही तर संस्कृती, परंपरा, भावना आणि काळानुसार बदल घडवून आणणारी दस्तावेज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Suhagraat : दुधाचा ग्लास, फुलांनी सजवलेला बेड आणि लाजणारी नवरी, अजब आहे सुहागरातची रिअल स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल