TRENDING:

Mobile Interesting Facts : मोबाईलमध्ये 5G दाखवतं पण स्पीड 4G सारखाच का असतो?

Last Updated:
4G Speed On 5G Network Mobile Internet : मोबाईलमध्ये 5G दिसणं म्हणजे तुम्हाला प्रचंड स्पीड मिळेलच, याची खात्री नसते. नेटवर्कचा प्रकार, टॉवरचं अंतर, फोनची क्षमता, प्लॅनची मर्यादा आणि आसपासचा वापर हे सगळे घटक मिळूनच तुम्हाला खरा 5G अनुभव देतात.
advertisement
1/9
Mobile Interesting Facts : मोबाईलमध्ये 5G दाखवतं पण स्पीड 4G सारखाच का असतो?
सध्या बहुतेक स्मार्टफोन्समध्ये नेटवर्कवर 5G चिन्ह दिसायला लागलं आहे. पण आश्चर्य म्हणजे इतक्या मोठ्या अनेकांना प्रत्यक्ष वापरात 4G पेक्षा फारसा फरक जाणवत नाही. व्हिडिओ स्ट्रिमिंग, फाइल डाऊनलोडिंग, सोशल मीडिया ब्राऊझिंग सगळं काही जवळपास जुन्या स्पीडवरच चालू असल्याचं अनेक वेळा जाणवतं. मग प्रश्न असा पडतो की, मोबाईलमध्ये 5G दाखवतं तरी स्पीड 4G सारखाच का येतो? यामागे तांत्रिक, नेटवर्क आणि उपकरणांशी संबंधित अशी अनेक कारणं आहेत.
advertisement
2/9
भारतासह अनेक देशांमध्ये सुरुवातीला NSA म्हणजे Non-Standalone 5G तंत्रज्ञान वापरलं गेलं. याचा अर्थ असा की डेटा 5G टॉवरवरून येतो पण कंट्रोल सिग्नलिंग 4G वर चालतं. खरा 5 स्पीड SA म्हणजे Standalone 5G मध्ये मिळतो. जो अजून फार कमी शहरांमध्ये आहे.
advertisement
3/9
5G चे तीन फ्रिक्वेन्सी बँड्स असतात. लो बँड, मिड बँड आणि एमएम वेव्ह. लो बँड (700 MHz) लांब रेंज पण स्पीड थोडा जास्त, मीड बँड 3.5 GHz चांगला स्पीड पण अतिवेग नाही, एमएम वेव्ह (26 GHz) 1–3 Gbps पर्यंत स्पीड पण रेंज खूपच कमी. भारतात मीड बँड सर्वाधिक वापरलं जातं.  mmWave फारच मर्यादित ठिकाणी आहे. म्हणून अनेकदा आपण वापरत असलेला Sub-6 GHz 5G (mid-band) हा जास्त वेगवान 4G इतकाच जाणवतो.
advertisement
4/9
टॉवरपासून अंतर आणि सिग्नलची गुणवत्ता 5G टॉवर जितका जवळ, तितका स्पीड जास्त. पण टॉवर दूर असेल, इमारतींचा अडथळा असेल, नेटवर्क कन्जेशन असेल तर फोनला फक्त 5G कनेक्शन मिळतं पण त्याची पूर्ण क्षमता वापरता येत नाही. परिणामी स्पीड 4G च्या आसपासच राहतो.
advertisement
5/9
5G सुरू झाल्यानंतर लाखो युझर्स त्यावर जोडले गेले. पण टॉवरची क्षमता मर्यादित असल्यामुळे एकाच सेलमध्ये जास्त युझर्स, टॉवरचा बँडविड्थ विभागला जाणं, पीक टाइममध्ये स्लो स्पीड अशा गोष्टी नेहमी दिसतात. यामुळे 5G दिसत असलं तरी स्पीड फारसा जास्त मिळत नाही.
advertisement
6/9
तुमच्या मोबाईलचा 5G मॉडेम मजबूत नसेल.  काही बजेट आणि मिड-रेंज फोनमध्येल बेसिक 5G बँड्स, कमी कॅरिअर एग्रीगेशन, मध्यम दर्जाचा मॉडेम, कमी मिमो कॉन्फिगरेशन असतं. यामुळे फोन 5G नेटवर्कला जोडला जातो, पण उच्च स्पीड प्रोसेस करण्याची क्षमता कमी असते.
advertisement
7/9
काही डेटा प्लॅन्समध्ये स्पीड कॅप असू शकतो प्रायोरिटी डेटा कमी कमी असतो, एफयूपीनंतर स्पीड कमी असू शकतो.  म्हणून 5G आयकॉन दिसल्यावरही अनुभव 4G सारखाच मिळतो.
advertisement
8/9
कधी कधी कारण आपल्या नेटवर्कचे नसून आपण वापरत असलेली वेबसाईट किंवा अॅपचं असू शकतं. त्यांचं सर्व्हर स्लो असू शकतं. जुन्या सर्व्हरवरून डाऊनलोड होत असावं, अॅपचाच बँडविड्थ कमी असावा. त्यामुळे मोबाईल डेटा अतिजलद असला तरी स्पीड कमी वाटू शकतो.
advertisement
9/9
आपण चालत असताना किंवा घरात फिरताना 5G कव्हरेज सतत बदलत असतं. कधी 4G anchor कधी 5G tower कधी कमजोर 5G, मजबूत 4G असं स्विच करत राहतो. यामुळे स्पीड स्थिर राहत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : मोबाईलमध्ये 5G दाखवतं पण स्पीड 4G सारखाच का असतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल