Mobile Interesting Fact : स्मार्टफोनची बॅटरी काढता का येत नाही, कंपनी ती सील का ठेवते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Why Smartphone batttery Non Removable : आता सगळे स्मार्टफोन वापरत असले तरी काही लोकांना जुन्या प्रकारचा बॅटरी काढता येईल असा फोन आजही आवडतो, पण सध्या ते बाजारात क्वचितच आढळतात.
advertisement
1/9

पूर्वी मोबाईल फोनमध्ये काही समस्या झाली की सहजपणे आपण त्याची बॅटरी काढायचो, ती पुन्हा घालायचो आणि बऱ्यापैकी समस्या अशाच दूर व्हायच्या. आताच्या स्मार्टफोनची बॅटरी तशी निघत नाही. त्यामुळे काही समस्या झाली की फोन सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा एखाद्या मोबाईल रिपेअर शॉपमध्येच न्यावा लागतो.
advertisement
2/9
तेव्हा असा प्रश्न पडतो की मोबाईल फोन स्मार्ट झालाय पण आता त्याची बॅटरी का काढता येत नाही. कंपन्या मोबाईलची बॅटरी अशी सील का करतात?
advertisement
3/9
जुन्या फोनटी बॅटरी काढता येत होती. तेव्हा फोन जाड आणि वजनदार असायचे. आता फोन हलके, स्लिम, स्टायलिश फोन असतात. त्यासाठी बॅटरी आत सील केली जाते जेणेकरून डिझाइन स्लिम ठेवता येईल.
advertisement
4/9
आताचे फोन वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ असतात याचं कारण म्हणजे त्याची बॅटरी सील असते, त्यामुळे ती सुरक्षित असते.
advertisement
5/9
आजच्या फोनमध्ये 4000–6000 mAh बॅटरी असते. अशी मोठी बॅटरी घट्ट बसवण्यासाठी पातळ प्लॅस्टिकचं कव्हर पुरेसं नसतं. बॅटरी फिक्स केल्याने जागा वाचते आणि क्षमताही वाढते.
advertisement
6/9
लिथियम-आयन बॅटरी खूप संवेदनशील असते. जर ती चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला तर ती फुगणे, स्पार्क, आग लागणे यासारखे धोके वाढतात. त्यामुळे बॅटरी आतूनच सील ठेवतात.
advertisement
7/9
आजचे फोन युनिबॉडी म्हणजे एकाच तुकड्यात तयार केले जातात. यामुळे फोन मजबूत होतो, स्क्रीन तुटण्याचा धोका कमी होतो, व्हाब्रेशन कमी होतात आणि चांगली फिनिशिंग मिळते.
advertisement
8/9
आताचे स्मार्टफोन फास्ट चार्जिंग होणारे असतात. यासाठी बॅटरी फोनच्या सरकिटला घट्ट जोडलेली असावी लागते. सैल काढता येणाऱ्या बॅटरीत ते शक्य नाही.
advertisement
9/9
बॅटरी काढता येत नसल्याने फोनचं वायरिंग, कनेक्टर, टर्मिनल सैल होत नाहीत. यामुळे फोन तांत्रिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतो. त्याचं आयुष्य वाढतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Fact : स्मार्टफोनची बॅटरी काढता का येत नाही, कंपनी ती सील का ठेवते?