पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आदेश जारी केले आहेत. त्यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, निगडी वाहतूक विभागांतर्गत मोर्चा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणेकर सावधान! पाण्याबाबत ‘ती’ चूक महागात पडणार, आता ‘रोबोट’ चोरी पकडणार
advertisement
सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार
निगडी-प्राधिकरण परिसरातील काचघर चौक ते भेळ चौक, संभाजी चौक आणि बिजलीनगर पुलापर्यंतच्या सेवा रस्त्यावरून येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनचालकांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, बिजलीनगर पूल ते पीएमआरडीए कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना एलआयसी कॉर्नरमार्गे इच्छित स्थळी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.