पुणे : पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ माजवणारी आणखी एक मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ चर्चेत पाहायला मिळत आहे. गोळीबार प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्याआधीच त्याने परदेशात पलायन केले. या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट येत आहे. निलेश घायवाळची चहूबाजूने पुणे पोलीस कोंडी करत आहेत. रम्यान निलेश घायवळवर पुणे पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
पासपोर्टवर नावामध्ये गोंधळ करत पळून गेलेल्या घायवळचा आता बाजार उठण्याची चिन्ह दिसत आहेत. पुणे पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले. निलेश घायवळवर नावाने सिमकार्ड वापरल्याबद्दल गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निलेश घायवळ याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या 25 दिवसात निलेश घायवळ याच्यावर तब्बल 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत घायवाळवर कोणकोणते गुन्हे दाखल?
- पहिला गुन्हा - गोळीबार प्रकरण
- दुसरा गुन्हा - बनावट नंबर प्लेट
- तिसरा गुन्हा -बनावट पासपोर्ट बनवल्या प्रकरणी
- चौथा गुन्हा - घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेत असताना अवैधरित्या सापडलेले जिवंत काडतुसे
- पाचवा गुन्हा - कोथरूडमध्ये एका बिल्डरला धमकवत दहा फ्लॅट नावावर करून घेतल्याप्रकरणी
- सहावा गुन्हा - बनावट सिमकार्ड प्रकरण
निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार का?
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या विदेशात असून त्यांचे लोकेशन लंडन आहे अशी माहिती मिळाली होती. मात्र, तो लंडनमधून नसून दुसऱ्याच देखील असल्याचं समजतंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळ सध्या स्विर्त्झंलंडमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला 90 दिवसांचा व्हिसा देखील मिळाला आहे. त्याच्या विरोधात जारी केलेली 'ब्लू कॉर्नर नोटीस' इंटरपोलमार्फत विविध देशांमध्ये पाठवण्यात आली आहे. यामुळे त्याचा ठावठिकाणा कळण्यास मदत होणार आहे. घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता निलेश घायवळला 90 दिवसानंतर अटक करणार का? असा सवाल विचारला जात आहे.