कसा असेल मार्ग?
सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड असा हा विस्तारित मेट्रोचा प्रकल्प आहे. वनाज कॉर्नर ते रुबी हॉल असलेला मेट्रो मार्ग असणार आहे. त्याची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती मेट्रोच्या वतीने देण्यात आलेली आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड फुगेवाडीपर्यंतच मेट्रो होती. नवीन मार्गामध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इथपर्यंत हा मार्ग असणार आहे. आज सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनसुद्धा पूर्ण क्षमतने सुरू झाले. याबाबत मेट्रो ट्रेनची चाचणी घेण्यात आली असून आज मेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले आहे.
advertisement
पंतप्रधान मोदी दगडूशेठ गणपती चरणी लीन, कोणती केली पूजा पाहा Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर केवळ पाच किलोमीटर एवढा मेट्रोचा प्रवास होत असल्याने तो पुणेकरांच्या उपयोगाचा नाही, अशी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा जवळपास साडेअकरा किलोमीटरचा मेट्रो प्रवासाचा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.
सध्या शहरात पावसाचे प्रमाण जास्त आहे, ठीक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे पुणेकरांना मेट्रोचा त्रास जास्त होत असल्याची टीका होत होती. मात्र आता पावसाळ्यातच पुणेकरांना मेट्रोचा फायदासुद्धा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवडवरून पुणे शहरात येण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
दर 10 मिनिटाला मेट्रो सेवा
पुणे मेट्रोचे तिकीट दर कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त 35 रुपये असणार आहे. पुण्यातले महत्त्वाचे स्टेशन्स यापुढे मेट्रोने जोडले जाणार आहेत. दर 10 मिनिटाला गर्दीच्यावेळी मेट्रो असणार आहे. तर कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रो असणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.