टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने आरोपीला अटक
खून केल्यानंतर विक्रमने कोणालाही संशय येऊ नये म्हणून सद्दामचा मृतदेह खोलीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या गवताळ जागेत फेकून दिला आणि स्वतः पळ काढला. मात्र, शनिवार दुपारपासून सुरू झालेल्या पोलीस तपासाने आरोपीला जास्त वेळ मिळू दिला नाही. पोलिसांनी मृताच्या मोबाईल नंबरचा मागोवा घेतला आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने 12 तासांच्या आत विक्रमाला शोधून काढलं.
advertisement
मित्राच्या क्रूर हत्येचे गूढ उकललं
रविवारी गुजरवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी कसून चौकशी करताच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि मित्राच्या क्रूर हत्येचे हे गूढ उकललं. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्यासह टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीविरोधात पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांमध्ये जोरदार भांडण झालं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम ऊर्फ सलमान शेख (35 वर्षे) या व्यक्तीचा खून झाला होता, तर त्याचा रुममेट विक्रम चैठा रोतिया (32 वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सद्दाम आणि विक्रम रोजंदारीवर काम करणारे मजूर होते आणि ते एकाच खोलीत राहत होते. त्यांची मैत्री पैशांच्या वादामुळे आणि सद्दामच्या त्रासामुळे हाणामारीत बदलली. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले, ज्याचे रूपांतर विक्रमाने सद्दामचा जीव घेण्यापर्यंत झालं.