TRENDING:

दंगल रोखण्याचा भिवंडी पॅटर्न नेमका काय? तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी सगळं सांगितलं, Video

Last Updated:

पोलिसांनी राबवलेल्या भिवंडी पॅटर्नमुळे बाहेर काही झालं तरी मोहल्ला शांत ठेवणार असा संदेश गेला. 70 मोहल्ले शांत होऊन पूर्ण भिवंडी शांत झाली, असं तत्कालिन पोलीस उपायुक्त सांगतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : मुंबईसारख्या शहराला दंगली होणं हे काही नवं नाहीये. त्यात भिवंडी सारख्या ठिकाणी एकेकाळी हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. ही दंगल रोखण्यासाठी भिवंडीमध्ये एक प्रयोग करण्यात आला. ज्याला भिवंडी पॅटर्न असं म्हटलं जातं. भिवंडी कामगारांचे शहर असल्यामुळे हे शहर दंगलीसाठी देखील ओळखलं जायचं. त्याच ठिकाणी इतकी भीषण परिस्थिती उद्भवलेली की, ती पोलिसांना हाताळने देखील अशक्य होते. अशावेळी तत्कालीन पोलीस उपायुक्त सुरेश खोपडे यांनी भिवंडी पॅटर्न राबवला. त्यामुळे भिवंडीतील दंगलीचा प्रश्न कायमचा मिटला. हा भिवंडी पॅटर्न नेमका काय? आणि तेव्हाचा अनुभव याबाबत खोपडे यांनी माहिती दिलीय.

advertisement

काय सांगतात तत्कालीन पोलीस उपआयुक्त?

"1988 ते 92 पर्यंत भिवंडी येथे पोलीस उपआयुक्त होतो. भिवंडी हे जातीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असं ठिकाण आहे. 1965, 68, 70 आणि 1984 साली भयानक दंगली झाल्या होत्या. त्याच काळात रथ यात्रा सुरु झाली होती. तेव्हा लक्षात आलं की भिवंडी शहर हे पुन्हा पेटणार आहे. भिवंडी मध्ये काम करण्याअगोदर मुंबईच्या महाराष्ट्र गुप्त हेर संघटनेमध्ये होतो. तेव्हा महाराष्ट्रात घडलेल्या अनेक जातीय दंगलींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तेव्हा लक्षात आलं की जातीय दंगली हाताळण्याची पद्धत फायर ब्रिगेड सारखी असते. फिक्स पॉईंट नेमलेले असतात आणि पोलीस वाट पाहतात. दंगल होण्याची बातमी आल्याबरोबर सायरन वाजवतात, लाठीमार करतात, लोकांना पकडतात आणि पुन्हा दंगलीची वर्दी येण्याची वाट पाहतात," असे तत्कालिन पोलीस उपआयुक्त खोपडे सांगतात.

advertisement

View More

छत्रपती शिवरायांच्या 'या' शस्त्राला आता राज्यशस्त्र म्हणून मान्यता, काय आहे नेमका इतिहास आणि ओळख?

दंगल रोखण्यासाठी काय केलं?

"दंगल होऊच नये यासाठी काही करता येईल का म्हणून प्रयत्न करत होतो. त्यासाठी 1984 ला भिवंडीमध्ये झालेल्या दंगलीचा इंपेरिकल स्टडी केला आणि त्यावर आधारित भिवंडी दंगल 1984 असं पुस्तक प्रकाशित केलं. अनेक लोकांचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की खूप सामान्य लोक त्याच्या मध्ये मारलेले होते. तुलसी नावाची एक महिला होती आणि तिचा मुलगा तिच्या डोळ्या समोर मारला गेला होता. त्याला गवताच्या गंजी वर टाकून जाळण्यात आलं. मग तिथे अभ्यास केला की जातीय दंगलीमध्ये सामान्य लोकच मारले जातात. दंगलीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता त्यातील 63 टक्के लोक हे दारिद्र्य रेषे खालील होते," असंही खोपडे यांनी सांगितलं.

advertisement

दंगल रोखण्यासाठी अनोखा पॅटर्न

जातीय दंगलीमध्ये परकीय शक्तीचा हात आहे, असं म्हटलं जातं. पण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की मारणारे लोक आणि मरणारे लोक एकाच मोहल्ल्यातील आहेत. मग याच लोकांना जर एकत्रित आणलं तर काय होईल? तेव्हा भिवंडी मध्ये 70 मोहल्ला कमिटी स्थापन केल्या. कारण जी शांतता कमिटी असते तीच खरी अशांतता कमिटी असते. लोक एकमेकांविरोधात भांडण करतात. त्यामुळे ही कमिटी रद्द करून 70 मोहल्ला कमिटी स्थापन केल्या होत्या.

advertisement

जेव्हा मनोहर जोशींनी सुरू केलं झुणका-भाकर केंद्र, आठवणीत शिवसैनिक भावूक

यामध्ये रिक्षा ड्रायवर, टॅक्सी ड्रायवर, प्रत्येक जमातीतील पाच महिला, स्थानिक पत्रकार अशा लोकांना घेण्यात आलं होत. जे समाज विघातक गुंड असतात आणि जे खूप जातीयवादी विचाराचे असतात त्यांना बाजूला काढलं. सगळ्या स्तरातील लोकांना याचं प्रतिनिधित्व दिलं. त्यांच्यावर अध्यक्ष म्हणून एक हेड कॉन्स्टेबल दिला. त्याचा फायदा होऊन हिंदू मुस्लिम एकत्रित येऊ लागले. त्यांच्या मधील गैरसमज दूर होऊ लागले. ते एकमेकांचे मित्र बनले, असे खोपडे सांगतात.

मोहल्ला शांत ठेवणार

पोलिसांनी राबवलेल्या या पॅटर्नमुळे बाहेर काही झालं तरी आम्ही आमचा मोहल्ला शांत ठेवणार असा संदेश गेला. 70 मोहल्ले शांत होऊन पूर्ण भिवंडी शांत झाली. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी फायदेशीर असा आहे. दोन जाती आणि धर्मांत तणाव निर्माण झाल्यास सामोपचारानं तोडगा काढता येऊ शकतो आणि सामाजिक सौहार्द कायम करता येऊ शकतं. सामाजिक शांतता टिकवण्यासाठी सर्व थरातील लोकांना एकत्र आणणारा भिवंडी पॅटर्न नक्कीच फायदेशीर आहे, असेही तत्कालिन पोलीस उपायुक्त खोपडे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/पुणे/
दंगल रोखण्याचा भिवंडी पॅटर्न नेमका काय? तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी सगळं सांगितलं, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल