पुणे: सध्या राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असून अनेकड मंडळांनी समाजप्रबोधनात्मक देखावेही साकारले आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या एका शाळेनं साकारलेला देखावा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. समाजातील स्त्रियांची स्थिती आणि पुरुषी मानसिकता यावर भाष्य करणारा हा देखावा असून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव यातून करून देण्यात आलीये.
बदलापूर घटनेनंतर शाळांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हीचं चिंता दूर करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडमधील शाळेने देखावा साकारलाय. केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलने या देखाव्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची आठवण करून दिली आहे. तसेच आज त्याच्या विचारांना कसा तडा जातोय? हे या देखाव्यातून मांडले आहे.
advertisement
महाराष्ट्रात पहिल्यांदाच मासिक पाळीवर आधारित जिवंत देखावा, पुण्यातील संयुक्त मित्र मंडळाने केला सादर
शाळेतील देखाव्यातून पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं दाखवून दिलं आहे. तसेच सामाजिक सुधारणांसाठी फुले दांपत्याने घेतलेले कष्ट, केलेला त्याग, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रेरणादायी लढा विद्यार्थ्यांना माहिती व्हावा, असा यामागील उद्देश आहे. तसेच सध्या देशात महिला आणि मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी मुलांची मानसिकता बदलणे गरजेचं आहे. महिलांचा आदर आणि सन्मान करण ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती पुरुषांना समजावी हीच भावना असल्याचं केंब्रिजज स्कुलचे शिक्षक कुंभार यांनी सांगितलं.
शंकराच्या समोर गणरायांची मूर्ती, पुण्यातील अमृतवेल मंडळाने साकारला शिवमंदिराचा देखावा
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे विचार देखील सांगण्यात आले. तसेच मुलांनी मुलींचा कसा आदर करायला पाहिजे? याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिशय सुंदर आणि वैचारिक देखावा शाळेने सादर करून मुलांना एक वेगळा संदेश या माध्यमातून दिला आहे.