धान्याचा 100 टक्के साठा उपलब्ध
पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्याचे वितरण सुरू आहे. शहरातील तीन झोनमध्ये एकूण 253 रेशन दुकाने कार्यरत आहेत. यात ‘अ’ झोनमध्ये 90, ‘ज’ झोनमध्ये 77 आणि ‘फ’ झोनमध्ये 86 दुकानांचा समावेश आहे. शहरातील अत्यंत गरीब गटातील (अंत्योदय) 3,710 शिधापत्रिकाधारकांसह अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 88,641लाभार्थ्यांना यंदा सप्टेंबर महिन्यात धान्य दिले जाणार आहे. या दोन्ही गटांसह एकूण 4,89,387 लाभार्थ्यांना सुविधा मिळणार आहे.प्रशासनाने नागरिकांना गोंधळ टाळण्याचे आवाहन केले असून, धान्याचा 100 टक्के साठा उपलब्ध आहे.
advertisement
Pune Metro: पुणे मेट्रोला बाप्पा पावला! प्रवासी संख्येत तिपटीने वाढ, गणेशोत्सवात विक्रमी कमाई
धान्य वितरणासाठी लाभार्थीची उपस्थिती आवश्यक
धान्य घेण्यासाठी संबंधित लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. लाभार्थींनी आपली शिधापत्रिका (राशन कार्ड) बरोबर आणावी. काही ठिकाणी आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र तपासणीसाठी मागवले जाऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे बरोबर ठेवावी.
धान्य घेताना नोंदी बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. नागरिकांनी ठरवलेल्या वेळेतच धान्य उचलावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी शहरातील ज झोन विभागाचे अधिकारी प्रदीप डांगरे यांनी सांगितले की, शहरातील धान्याचा पुरवठा पूर्णपणे 100% उपलब्ध आहे. लाभार्थींनी घाई न करता, 30 सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत आपले धान्य उचलावे. सर्व रेशन दुकाने सोमवार वगळता इतर दिवशी नियमितपणे चालू राहणार आहेत.