पुण्यात रोज सकाळी सहा वाजता सुरू होणारी मेट्रो सेवा, या विशेष दिवशी पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरू होणार आहे. दोन नोव्हेंबरच्या पहाटे तीनपासून ते सहा वाजेपर्यंत दोन्ही मार्गांवर पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी प्रत्येक 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून मेट्रोचे नियमित वेळापत्रक सुरू राहील.
advertisement
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच निमित्ताने ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ‘रन फॉर युनिटी’च्या उपक्रमांद्वारे राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला जातो. पुण्यातील एस. पी. कॉलेज मैदानातून सुरू होणारी ही महामॅरेथॉन शहरातील विविध भागातून धावणार आहे.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महा मेट्रो कडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.






