पुण्यातील वाडिया कॉलेज बाहेर अभाविपने बायकॉट मनविसे असे पोस्टर्स लावले असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आला आहे.
advertisement
ABVP च्या विरोधात पुण्यात मनविसे आक्रमक होत त्यांनी अभाविपच्या पुण्यातील टिळक रोडवर असणाऱ्या कार्यालयाला कुलूप लावलं.
ABVP कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाला कुलुप लावण्यात आलं.
ABVP जाणून बुजून असे प्रकार करत असल्याचा दावा यावेळी मनसैनिकांकडून करण्यात आला आहे
तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या आंदोलनानंतर ABVP च्या कार्यकर्त्यांनी देखील लॉक लावलेल्या ऑफिस बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केल आहे
पेरूगेट पोलीस चौकी समोर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
ज्यांनी कार्यालयाला टाळ लावलं त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे